पुणे- कृषि उत्पन्न बाजार समितीच्या प्रशासकाने जिझिया कराप्रमाणे भाडे आकारणी ची कार्यवाही करा सांगितल्याने उपोषणाला बसलेल्या पथारीवाल्यांच्या समस्या आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पर्यंत पोहोचल्याने उपोषण तूर्तास स्थगित करण्यात आले आहे. येत्या शुक्रवारी विधानभवनात या विषयावर खुद्द उपमुख्यमंत्री आदेश देणार असल्याने हे आंदोलन स्थगित केल्याची माहिती पथारी व्यावसायिक पंचायतीचे बाळासाहेब मोरे यांनी येथे दिली .
ते म्हणाले माफ्को शेजारील तालेरा गार्डन नजीकच्या पट्ट्यात पथारीवाल्यांना बसण्यासाठी सुमारे १४ ते १६ वर्षांपासून खुद्द अजित पवार यांनीच मान्यता दिली होती . तेव्हापासून येथे हे पथारी व्यावसायिक व्यवसाय करीत आहेत. एवढ्या वर्षानंतर गेल्या दिनांक 2 नोव्हेंबर रोजी प्रशासक गरड यांनी या पथारीवाल्यांवर कारवाई केली असता ,त्यांच्या शी बैठक घेऊन आम्ही त्यांना वास्तविकता सांगून पथारीवाल्यांवर कारवाई करू नये असे सांगितले असता त्यांनी दररोज ५०० रुपये भाडे अधिक ९० रुपये जीएसटी आकारून तुम्ही व्यवसाय करा असे सांगितले. ५९० रुपये रोज भरून पथारीवाले व्यवसाय करणार म्हणजे अति झाले .. त्यांना सांगूनही समजेना म्हणून आम्ही उपोषणाचा मार्ग पत्करला.आम्ही बाजार समितीच्या दारात उपोषण सुरु केले .संतोष नांगरे इकबाल आळंद मोहन चिंचकर जब्बार शेख ताराबाई नलावडे नीलम अय्यर अफरोज बागवान फिरोज बागबन शिवसरण गायकवाड राजेंद्र पिसाळ शुभम मानकर आदी या वेळी उपस्थित होते. आता उपमुख्यमंत्री पवार यांच्या समवेत होणार्या बैठकीत काय निर्णय होतील यावर पुढील आंदोलनाची दिशा ठरविण्यात येईल असे मोरे यांनी सांगितले.

