लखनऊ/वाराणसी : काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी आज सोनभद्र जिल्ह्यात जमिनीच्या वादातून झालेल्या हत्याकांडा तील पीडित कुटुंबीयांच्या भेटीसाठी सोनभद्रकडे निघाल्या होत्या. त्याचवेळी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली .दरम्यान या प्रकारामुळे देशभर कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट उसळली असून कॉंग्रेसचे जनरल सेक्रेटरी के सी वेणुगोपाल यांनी या कृतीचा जोरदार निषेध देशभरातील कॉंग्रेस कार्यकर्ते करतील असे सांगितले
सोनभद्र हत्याकांड प्रकरणात १० जणांची हत्या झाली होती. या हत्याकांडामुळे सोनभद्र परिसरात जमावबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे पोलिसांनी प्रियांका गांधींना रोखलं. त्यानंतर प्रियांका गांधींनी रस्त्यातच ठाण मांडून आंदोलन सुरु केलं असता, पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं आहे. या घटनेनंतर आम्हाला केवळ पीडित कुटुंबीयांची भेट घ्यायची आहे. माझ्यासोबत फक्त चार जण असतील असंही मी सांगितलं होतं. तरीही हे प्रशासन आम्हाला तिथे जाऊ देत नाही. आम्हाला का अडवलं याचं उत्तर द्यायला हवं,’ असं प्रियांका म्हणाल्या. ‘पोलीस आम्हाला ताब्यात घेऊन कुठे नेत आहेत हे आम्हालाही माहीत नाही. मात्र आम्ही कुठेही जाण्यास तयार आहोत’ अशी प्रतिक्रिया प्रियंका यांनी दिली.
दरम्यान प्रियांका यांनी सुरुवातीला लखनऊमध्ये जाऊन गोळीबारात जखमी झालेल्यांची विचारपूस केली. त्यानंतर त्या पीडितांच्या कुटुंबीयांच्या भेटीसाठी सोनभद्रकडे निघाल्या. त्याचवेळी नारायणपूरजवळ त्यांचा वाहनताफा अडवला. या कारवाईविरोधात प्रियांकांनी रस्त्यावरच धरणे धरले. पोलिसांनी परिसरात जमावबंदी आदेश लागू केले. त्यानंतर प्रियांकांना ताब्यात घेण्यात आले .
उत्तर प्रदेशमध्ये गुन्हेगार सुसाट
सोनभद्रला जाताना प्रियंकांच्या ताफ्याला वाराणसीजवळच थांबवण्यात आले. त्यानंतर त्या धरण्यावर बसल्या. प्रियंकांनी याआधी ट्रॉमा सेंटरमधून निघताना मीडियाशी बोलताना सांगितले होते की, उत्तर प्रदेशमध्ये कायदा सुव्यवस्था राखली जात नाही. येथील गुन्हेगार सुसाट आहेत, त्यांना सरकारची भीती राहिली नाहीये.
प्रियंका गांधींनी योगी अदित्यनाथांना पत्र लिहीले
गुरुवारी प्रियंकांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना एक पत्र लिहीले. त्यात त्यांनी लिहीले की, राज्यातील दौऱ्या दरम्यान दिलेल्या सुरक्षेचे कौतुक करते, पण या सुरक्षेमुळे जनतेला होणाऱ्या त्रासामुले दुखी आहे. जनतेची सेवक असल्यामुळे माझ्यामुळे कोणालाही त्रास होता कामा नये.