पुणे- : राजीव गांधी प्राणि संग्रहालयातील सर्वांत वयाे वृद्ध आणि रूबाबदार पांढरी वाघीण म्हणून पर्यटकांचं प्रमुख आकर्षण असलेली प्रियदर्शनीने पुर्णपणे थकलेल्या अवस्थेत काल सायंकाळी अखेरचा श्वास घेतला.‘डिसेंबर २००६ मध्ये या वाघीणीला बोरोवली येथील संजय गांधी नँशनल पार्क येथून आणण्यात आले होते. सामान्यत: कुठल्याही वाघाचे आयुष्य हे १६ ते १८ वर्षे इतके असते मात्र सदृढ प्रियदर्शनीने २१ वर्षांचे आर्युमान गाठले होते. त्यामुळे ती प्राणी संग्रहालयातील सर्वांत वयस्क वन्यजीव ठरली.
पुणे शहराचे वैभव असलेल्या राजीव गांधी प्राणी संग्रहालयात मुख्य आकर्षण असलेल्या वाघांची संख्या सात…!
प्रियदर्शनच्या हालचाली वृद्धापकाळाने गेल्या पाच वर्षांपासून मंदावल्या होत्या. त्यामुळे तिला व्याघ्र प्रदर्शनात सोडले जात नव्हते. मागील चार पाच दिवसांपासून ति जमिनीशी खिळून होती. अन्नपाणी सोडून दिल्यामुळे अशक्तपणा आला होता, प्राणी संग्रहालय प्रशासनाने तिला वाचवण्यासाठी शर्तीचे प्रय त्न केला मात्र शुक्रवारी सायंकाळी तिचा मृत्यू झाला. प्रियदर्शिनीसह प्राणिसंग्रहालयात आठ वाघ होते ती संख्या आता सात झाली आहे. त्यामध्ये गुरु, आकाश, तानाजी व अर्जुन हे चार वाघ व रिद्धी, भक्ती आणि नामकरण न झालेली एक वाघीण अशा तीन वाघीण आहेत.
सामन्यात वाघांना वयाच्या पंधरा वर्षांपर्यंत पर्यटकांना पाह ण्यासाठी खंदकात सोडले जाते, त्यानंतर मात्र त्यांच्या हाल चाली मंदावत असल्याने पर्यटकांना पाहण्यासाठी सोडले जात नाही. वयाने या वाघीणीला खूपच मोठे आयुष्य लाभले होते. माणसाच्या वयाशी याची तुलना केल्यास या वाघीणीचे २१ वर्षे जगणे हे माणसाने १०० वर्षे जगण्याइतके असल्याचे प्राणी संग्रहालयाचे संचालक डॉ. राजकुमार जाधव यांनी सांगितले.
प्राणिसंग्रहालयात आता सात वाघ आहेत. त्यामध्ये चार नर, तीन मादींचा समावेश आहे. गेल्या काही दिवसांपासून प्रियदर्शनी कमी खात-पित होती. त्यामुळे तिचे आरोग्य खालावले होते. प्राणिसंग्रहालयाचे संचालक राजकुमार जाधव व इतर कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत प्रियदर्शनीवर अंत्यसंस्कार करण्यात आले.
प्रियदर्शनीची देखभाल दुरूस्ती करणारे दत्ता चांदणे म्हणाले,”गेल्या अनेक वर्षांपासून मी तिची काळजी घेत होतो. तिने कधीही माणसांवर हल्ला केला नाही. ती अतिशय शांत स्वभावाची होती. चिडचिडेपणा कधीच दाखवला नाही. तिच्यासाठी नुकताच पांढरा नर वाघ आणला होता. पण त्यांना वेगवेगळे ठेवले जात होते.”

