गणेशोत्सव संपेपर्यन्त मिळणार नाही खाजगी क्लासेस आणि हॉटेल्स ला परवानगी

Date:

पुणे – स्पर्धा परीक्षा, व्यवस्थापनशास्त्र, (एमबीए), अभियांत्रिकीसह काही अभ्यासक्रमांचे क्‍लासेस (खासगी शिकवणी वर्ग) सुरू होण्याची शक्‍यता आहे. अशा अभ्यासक्रमांच्या परीक्षा पुढच्या वर्षी होणार असल्याने क्‍लासेसला परवानगी देण्याचा आग्रह विद्यार्थी, पालक, शिकवणी चालकांनी धरल्याने; त्यावर सकारात्मक निर्णय होऊ शकतो, असे महापालिकेकडून सांगण्यात आले. त्यामुळे पुढच्या आठवड्यात म्हणजे, एक सप्टेंबरनंतर क्‍लासेस सुरू होण्याची आशा आहे. मात्र, कोरोनाच्या संसर्गाचा आढावा घेऊनच क्‍लासेसबाबत तसेच हॉटेल्स बाबत निर्णय होईल, येत्या शुक्रवारी होणाऱ्या बैठकीत यावर चर्चा होईल असे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी सोमवारी स्पष्ट केले.

दरम्यान, सध्याच्या स्थितीत एक सप्टेंबरपासून नवे काही बदल करण्याबाबत येत्या शुक्रवारी महापालिकेत बैठक होणार असून, त्यामध्ये बंद असलेले व्यवहार, विशेषत: क्‍लासेस आणि खासगी आस्थापनांना आणखी काही सवलती दिल्या जानार काय हा प्रश्न उपस्थित होतो आहे.कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर शाळा-महाविद्यालयांसह खासगी शिकवणी वर्गही बंद आहेत. सध्या बहुतांशी व्यव्हार सुरू झाले तरीही, शैक्षक्षिक संस्था सुरू झालेल्या नाहीत. त्यातच परीक्षा न घेण्याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. मात्र, पुढच्या वर्षी परीक्षा होणार असल्याने किमान खासगी शिकवण्यांचे वर्ग सुरू व्हावे, अशी अपेक्षा विद्यार्थी-पालकांची आहे. ही मागणी लावून धरत क्‍लासेस सुरू करण्यासाठी मालकांनीही आग्रह धरला आहे. या पार्श्‍वभूमीवर क्‍लासेसला परवानगी मिळण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे.

कोरोनाचा संसर्ग, सद्य:स्थिती, आरोग्य यंत्रणा आणि वाढत्या संसर्ग याचा दर महिन्याला दोनदा आढावा घेण्यात येतो. त्यानंतर महापालिकेच्या माध्यमातून व्यवहारांबाबतची बंधने-सवलती ठरविण्यात येतात. त्याचाच भाग म्हणून येत्या एक सप्टेंबरपासून नव्याने काय सुरू करायचे, यासाठी महापालिका आयुक्त आढावा बैठक घेणार आहेत. त्यानंतर क्‍लासेस आणि अन्य व्यवहारांबाबतचे नवे निर्णय जाहीर होतील.

बाजारपेठांबाबतचे बहुतांशी अटी-शर्ती शिथिल केल्यानंतर हॉटेलही सुरू होण्याची आशा होती. त्यामुळे एक सप्टेंबरपासूनच्या नव्या नियमात हॉटेल सुरू करण्याची सवलत मिळेल का, याची उत्सुकता आहे. परंतु, गणेशोत्सव संपेपर्यंत हॉटेलला परवानगी मिळण्याची शक्‍यता नाही, असे महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. त्यावरही या आठवड्याच्या आढावा बैठकीत चर्चा होणार आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

ओसवाल बिल्डरने जागा बळकावण्याचा प्रयत्न केल्याने ज्येष्ठ नागरिकाची आत्महत्या

पुणे: येथील बाणेर भागात विकसित करण्यासाठी दिलेल्या मिळकतीच्या व्यवहारात...

पुण्यातील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमुळे आज मला मनुवादी वृत्तीच्या विरोधातील पुढचा लढा लढण्यासाठी अधिक बळ मिळाले:हर्षवर्धन सपकाळ

पुणे महानगरपालिकेच्या निवडणुका पार पडल्यानंतर प्रथमच प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धनजी...

अजित पवार विमान अपघाताचा प्राथमिक अहवाल २८ फेब्रुवारीपूर्वीच:केंद्रीय विमान वाहतूकमंत्री मुरलीधर मोहोळ

खासदार जनसंपर्क सेवा अभियानाला मोठा प्रतिसाद पुणे शहराला देशातील सर्वोत्तम...

शासकीय अधिकाऱ्यांनी चांगले वाचन करणे गरजेचे : पुलकुंडवार

दुसऱ्या राज्यस्तरीय शासकीय अधिकारी मराठी साहित्य संमेलनाचा समारोप पुणे (प्रतिनिधी)...