आ.चंद्रकांत पाटील यांच्या माध्यमातून निगेटिव्ह ion जनरेटरचे संच उपलब्ध.
पुणे- कोरोनापासून बचावासाठी आणि रुग्णालयांच्या निर्जंतुकीकरणासाठी आज माझ्या कोथरूड मतदारसंघातील सुतार दवाखान्याला निगेटिव्ह ion जनरेटरचे चार संच उपलब्ध करून दिले आहेत. यासाठी एचडीएफसीने आपल्या सीएसआर फंडातूनही मदत केली आहे.
कोरोनापासून बचावाला सध्या प्राधान्य दिले जात असून, रुग्णालयांचे निर्जंतुकीकरण करणे गरजेचे आहे. त्यासाठी भाजपा प्रदेशाध्यक्ष आणि कोथरूडचे आमदार चंद्रकांतदादा पाटील यांनी निगेटिव्ह ion जनरेटरचे चार संच उपलब्ध करून दिले असून, यासाठी एचडीएफसीने आपल्या सीएसआर फंडातूनही मदत उपलब्ध करून दिली आहे. हे चारही संच आज श्री. पाटील यांनी दवाखान्याच्या प्रमुख डॉ. अंजली टिळेकर यांना सुपूर्द केले. या संचाच्या माध्यमातून सुमारे चारशे चौरस फूट इतक्या भागाचे निर्जंतुकीकरण करणे शक्य होते.
यावेळी पुणे शहर भाजपा उपाध्यक्ष डॉ. संदीप बुटाला, स्थानिक नगरसेविका आणि प्रभाग समिती अध्यक्षा हर्षाली माथवड, शहर सुधारणा समिती सदस्या वासंती जाधव आदी उपस्थित होते.

