लास व्हेगास येथे जून २०१७ मध्ये होणाऱ्या जागतिक सौंदर्य स्पर्धेत भारताचे प्रतिनिधीत्व करणार
पुणे, : पुणेस्थित प्रिनीत ग्रेवाल (वय २९) हिच्यासाठी गेल्या आठवड्यातील तो क्षण अत्यंत अभिमानाचा ठरला, जेव्हा तिचे नाव ‘मिसेस इंडिया अर्थ २०१६’ सौंदर्य स्पर्धेची विजेती म्हणून पुकारले गेले आणि फॅशन उद्योगातील नामवंत सदस्यांच्या उपस्थितीत झालेल्या शानदार समारंभात सन्मानाचा हा मुकूट तिच्या डोक्यावर चढवण्यात आला. ही स्पर्धा द्वारकेतील एका हॉटेलमध्ये तीन दिवस सुरु होती. स्पर्धेत दुसरा आणि तिसरा क्रमांक (फर्स्ट व सेकंड रनर्स-अप) अनुक्रमे पॅरीस केसवानी व रोशनी हसन यांना मिळाला.
‘ब्युटी विथ कॉज’ हे बोधवाक्य असलेल्या या सौंदर्य स्पर्धेत प्रत्येक स्पर्धकाला निवडक पर्यावरणीय कामगिरी देण्यात आली होती. त्यातून यंदा देशात व परदेशात १५००० हून रोपे रुजवण्यात आली. वरील बोधवाक्याला अनुसरुन विजेत्यांनी स्वतःला स्वयं-जाणीवेचे, तसेच सामाजिक प्रशंसेच्या प्रगतीचे प्रेरक म्हणून परिवर्तित करावे, अशी आशा आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून आम्हाला महिलांमध्ये जागृती निर्माण करायची आहे, तसेच त्यांना सक्षमही बनवायचे आहे, अशी प्रतिक्रिया ‘मिसेस इंडिया अर्थ’ सौंदर्य स्पर्धेचे संचालक विनय यादवा यांनी यावेळी व्यक्त केली.
आपल्या व्यक्तीमत्त्वातून सौंदर्य, बुद्धिमत्ता, चातुर्य व करुणा यांचा आविष्कार घडवणाऱ्या महिलांचा गौरव करण्यासाठी ही सौंदर्य स्पर्धा दरवर्षी आयोजित केली जाते. भारतीय महिलेला तिच्या जीवनकाळात अनेक लक्षणीय भूमिका निभावाव्या लागतात, ज्यातून तिचे स्थान अत्यंत महत्त्वाचे होते. उद्योजकतेच्या धर्तीवर ती व्यवसाय संघटनेचा विचार व संचालन करते, जोखीम घेते आणि व्यवसायाची देखभाल करताना आवश्यक असलेल्या आर्थिक अनिश्चितताही यशस्वीपणे हाताळते.
कोणत्या गोष्टीने आपल्याला ‘मिसेस इंडिया अर्थ’ स्पर्धेत भाग घेण्याची प्रेरणा दिली, हे विशद करताना प्रिनीत ग्रेवाल म्हणाली, की मी जेव्हा क्विन (राणी) हा शब्द ऐकते तेव्हा माझ्या मनासमोर अशी एक स्त्री उभी राहते जिला पराभवाची भीती नाही, जी धैर्याने आपल्यावर झालेले ओरखडेही पदकांप्रमाणे मिरवते आणि जी प्रत्येक अपयश हे यशाकडे जाण्याची आधारशिला म्हणून पाहते. मीसुद्धा माझे आयुष्य असेच जगते. ही स्पर्धा म्हणजे केवळ सौंदर्याचाच नव्हे, तर विवाहित महिला असण्याचा व तिचे विजय आणि त्याच्याशी संबंधित सकारात्मतेचा गौरव करणारे व्यासपीठ आहे. हे व्यासपीठ पुढे महिलांना आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचे प्रतिनिधीत्व करण्याची संधी देते. त्या नामवंतांच्या यादीत समावेशाची संधी मला तरी गमवायची नव्हती.
प्रिनीत ग्रेवाल ही जॉन डीअर कंपनीत मानवी साधनसंपत्ती व्यावसायिक (एचआर प्रोफेशनल) म्हणून जबाबदारी सांभाळते. यानंतर ती अमेरिकेतील लास व्हेगास येथे जून २०१७ मध्ये होणाऱ्या जागतिक सौंदर्य स्पर्धेत भारताचे प्रतिनिधीत्व करणार आहे. “या स्पर्धेतील यशाचे श्रेय मी माझ्या आयुष्यातील दोन आधारस्तंभ अर्थात माझी आई आणि माझे पती यांना देते,” असे प्रिनीतने कृतज्ञतापूर्वक नमूद केले.