मोठ्या संख्येमध्ये रोजगार संपुष्टात येण्याची शक्यता- भाजपा अध्यक्ष लोढ़ा
मुंबई- देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईमध्येसुद्धा लॉकडाउन उघडण्याबरोबरच वैद्यकीय सुविधा विकसित करण्याविषयी राज्य सरकारने तत्काळ विचार करावा, कारण देशातील काही अन्य राज्यांमध्ये लॉक-डाउन उघडण्याची सुरुवातही झाली आहे. मुंबईची अर्थव्यवस्था संकटात आहे, त्यामुळे मुंबईमध्येही आरोग्य सेवा सुधारणांसह त्या बळकट करण्याबरोबर लॉक- डाउन उघडण्यासंदर्भात राज्य सरकारने आपली योजना स्पष्ट करावी, अशी मागणी भारतीय जनता पार्टी, मुंबईचे अध्यक्ष मंगल प्रभात लोढ़ा यांनी राज्य सरकारला केली आहे. लोढ़ा यांनी म्हंटले आहे की, लॉकडाउन आणखी काही काळ राहिला, तर मुंबईतील उद्योग धंदे व व्यापार ठप्प होईल व त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी समाप्त होतील, आणि लॉक- डाउन उघडल्याशिवाय वैद्यकीय सुविधांचा विकाससुद्धा शक्य नाही आहे.
लॉकडाउन संदर्भात मुंबईच्या जनतेमध्ये अनिश्चिततेचे वातावरण आहे, असे म्हणून मुंबई भाजपा अध्यक्षांनी म्हंटले की, 18 मे नंतर मुंबईमध्ये रोजगाराची स्थिती कशी असणार आहे, हे लोकांना माहिती नाही आहे. त्यांनी म्हंटले आहे की, मुंबईमध्ये आता जर आरोग्य सेवांमध्ये सुधारणा करण्यासाठी भक्कम प्रयत्नांबरोबरच राज्य सरकारने लॉकडाउन उघडले नाही, तर मुंबईसाठी आगामी काळात परिस्थिती अतिशय गंभीरसुद्धा होऊ शकते. कारण एका बाजूला कोरोना संक्रमित लोकांची संख्या वाढेल व दुसरीकडे वाणिज्य कामेही ठप्प होतील. ही परिस्थिती समजल्यामुळे लोक मोठ्या संख्येने मुंबईतून निघून जाण्याच्या तयारीत आहेत. लोढ़ा यांनी हेसुद्धा म्हंटले की, लोकांना हे माहिती नाही आहे की, लॉकडाउननंतर सरकार कशा प्रकारे मार्केट उघडणार आहे व व्यापाराच्या विकासासाठी कशा प्रकारे प्रयत्न करणार आहे. अशा असमंजस स्थितीमध्ये अडकलेल्या लाखो कामगार लोकांना कसेही करून मुंबईतून बाहेर पडावेसे वाटत आहे.
मुंबई भाजपा अध्यक्ष लोढ़ा यांनी म्हंटले आहे की, महाराष्ट्र सरकार ह्याबद्दल काहीही बोलत नाही आहे. त्याउलट देशातील काही इतर राज्यांनी ह्यासंदर्भातील आपली योजना घोषित करून लॉकडाउन उघडण्याची प्रक्रियासुद्धा सुरू केली आहे. लोढ़ा यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाचे कौतुक केले व म्हंटले की, 24 मार्चला देशामध्ये लॉक-डाउन करण्याचा निर्णय घेणे अतिशय महत्त्वाचे होते. कारण तेव्हा लॉक- डाउन झाले नसते तर देशभरात आणि मुंबईमध्येही स्थिती अतिशय भयावह झाली असती. परंतु मुंबईमध्ये कोरोना संक्रमणाची जी स्थिती आहे, ती खूप दीर्घ काळ टिकणारी आहे. कारण आरोग्य सेवांना बळकटी दिल्याशिवाय परिस्थितीमध्ये सुधारणा शक्य नाही आहे. अशा स्थितीत, मुंबईच्या अर्थव्यवस्थेला विपरित अवस्थेत जाण्यापासून वाचवणे हे सर्वांचे पहिले कर्तव्य आहे. त्यामुळे देशातील इतर राज्यांच्या बरोबरच मुंबईमध्येही राज्य सरकारने आरोग्य सेवांना बळकटी देण्यासाठी व त्यांना भक्कम करण्याबरोबर लॉकडाउन उघडण्यासंदर्भात तत्काळ निर्णय घेऊन आपली योजना स्पष्ट केली पाहिजे.

