मोदींच्या नेतृत्वात देश सुरक्षित आणि सक्षम – मुख्यमंत्री
मुंबई-पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण देश आणि आपली सेना शहिदांचा सूड घेण्यासाठी आणि देशाचे संरक्षण करण्यास सक्षम आहे. हे पुलवामाचा सूड घेल्याने सिद्ध झालं असल्याचं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. वाळकेश्वर येथील बाणगंगा येथे आयोजित कमल ज्योति संकल्प अभियान या कार्यक्रमात ते बोलत होते. भाजपकडून आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात राज्य भाजपचे सरचिटणीस विजय पुराणिक आणि महाराष्ट्र भाजपचे उपाध्यक्ष मंगल प्रभात लोढा मुख्यमंत्र्यांसोबत व्यासपीठावर उपस्थित होते.
या प्रसंगी मुख्यमंत्र्यांनी नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील विविध सरकारी योजनांद्वारे देशाच्या २२ कोटी लोकांच्या जीवनात आलेल्या सकारात्मक विकासाठी लोकांचे अभिनंदन केले. मुख्यमंत्र्यांनी सरकारी विकास योजनेच्या लाभार्थ्यांचे कार्यक्रम आयोजित करण्यासाठी आमदार मंगल प्रभात लोढ़ा यांचे आभार व्यक्त करत म्हणाले की, कमल ज्योती संकल्पनेच्या या कार्यक्रमात १ हजार पेक्षा जास्त लाभार्थी आणि मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थिती आनंदाची बाब आहे. पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशात विकासाची गती वाढली आहे, कारण देशभरात भ्रष्टाचार संपला असून दलालांचा खात्मा झाला असल्याचे ते म्हणाले आहेत. या कार्यक्रमात भाजपा नेते संजय उपाध्याय यांनीही महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
मुख्यमंत्री पुढे म्हणाले कि, पुलवामा हल्ल्याचा बदला घेण्याची भावना प्रत्येक भारतीयाच्या हृदयात होती आणि मोदीजींनी देशातील लोकांच्या मनातील भावना समजून सर्जिकल स्ट्राइक करून शहिदांच्या रक्ताच्या प्रत्येक थेंबाचा बदला घेतला आहे. भारतीय सेनेकडून पाकिस्तानात घुसून केलेल्या कामगिरीमुळे जनतेत उत्साहाचे वातावरण होते. त्यात कमल ज्योती संकल्प योजना देशातील २२ कोटी लोकांपर्यंत पोहोचविण्याचे यश सर्जिकल स्ट्राईकचा उत्सव झाला होता. या कार्यक्रमात जमलेल्या लोकांनी भारत मातेचा जयघोष करत पाकिस्तान मुरादाबादच्या घोषणा दिल्या.