वाराणसी येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ‘अक्षयपात्र’च्या नवीन किचनचे उद्घाटन

Date:

वीन स्वयंपाकघर हे अक्षयपात्रचे देशातील ६२वे युनिट; २८२ शाळांमधील १ लाखाहून अधिक विद्यार्थ्यांना सेवा देण्यास फाउंडेशन सज्ज

वाराणसीउत्तर प्रदेश जुलै२०२२ : ‘अक्षयपात्र फाउंडेशन’च्या नवीन स्वयंपाकघराचे (किचन) उद्घाटन आज येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ उपस्थित होते.

‘वेस्टब्रिज कॅपिटल’ या कंपनीच्या सहकार्याने सुरू करण्यात आलेले हे अत्याधुनिक केंद्रीकृत स्वयंपाकघर सुमारे ३ एकर क्षेत्रामध्ये पसरलेले आहे. अक्षयपात्रचे हे देशातील ६२ वे आणि उत्तर प्रदेश राज्यातील पाचवे स्वयंपाकघर आहे. या फाउंडेशनतर्फे प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेद्वारे (पीएम पोषण – पूर्वीची ‘मिड-डे मील’ (एडीएम) योजना) एक लाखाहून अधिक मुलांना नियमित पोषक आहार देण्यात येणार आहे.

‘अक्षयपात्र’च्या या नव्या किचनच्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे प्रमुख पाहुणे होते, तर राज्यपाल आनंदीबेन पटेल आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे विशेष अतिथी होते. यावेळी _______________ आदी मान्यवरही उपस्थित होते. ‘अक्षयपात्र’चे अध्यक्ष मधु पंडित दासा आणि उपाध्यक्ष चंचलपती दासा हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.

उद्घाटनाच्या कार्यक्रमानंतर स्वयंपाकघरातील सुविधांचा फेरफटका आणि मुलांना प्रतीकात्मक जेवण हाही कार्यक्रम घेण्यात आला. पोषण आहार योजनेच्या माध्यमातून देशातील भूक व कुपोषण दूर करण्यासाठी अक्षयापात्र करीत असलेल्या प्रयत्नांची उपस्थित मान्यवरांनी निःसंदिग्धपणे प्रशंसा केली आणि संस्थेच्या उपक्रमाला पाठिंबा देण्याचे आश्वासन दिले.

अक्षयपात्र किचनचे उदघाटन झाल्यानंतर दुसऱ्या एका कार्यक्रमात बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, “मला आज माध्यान्ह भोजन योजनेसाठी (पीएम पोषण) केंद्रीकृत स्वयंपाकघराचे उद्घाटन करण्याची संधी मिळाली. या सोहळ्यादरम्यान, मला माझ्या वाराणसी शहरातील सरकारी शाळेमधील काही १०-१२ वर्षांच्या मुलांशी संवाद साधण्याचीही संधी मिळाली. पुढच्या वेळी मी वाराणसीला येईन, तेव्हा मला या विद्यार्थ्यांच्या शिक्षकांना भेटायला हवे. मी फक्त १५ मिनिटांसाठी त्यांच्यासोबत होतो; पण या मुलांमधील प्रतिभा, त्यांनी दाखवलेला आत्मविश्वास आणि त्यांना अवगत असलेली विविध कौशल्ये, यांमुळे मी भारावून गेलो. ही मुले सामान्य कुटुंबातील आहेत व ती सरकारी शाळेत शिकतात, ही बाब येथे अगदी नगण्य ठरते.”

‘अक्षयपात्र फाऊंडेशन’चे अध्यक्ष मधु पंडित दासा यांनी याप्रसंगी आपली कृतज्ञता व्यक्त केली. ते म्हणाले, “वाराणसीमध्ये आमच्या नवीन स्वयंपाकघराचे उद्घाटन करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या व्यग्र वेळापत्रकातून वेळ काढला, याबद्दल मी त्यांचे मनःपूर्वक आभार मानतो. या सोहळ्याला शुभेच्छा दिल्याबद्दल राज्यपाल आनंदीबेन पटेल व मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचेही मला आभार मानायचे आहेत. आज आम्ही उत्तर प्रदेश सरकारच्या सहकार्याने आणखी एक अध्याय लिहित आहोत. वाराणसीच्या मुलांची सेवा करण्याच्या या संधीबद्दल आम्ही सरकारचे अत्यंत आभारी आहोत. प्रशासनाच्या विविध विकासात्मक कार्यक्रमांना व योजनांना पाठिंबा देण्याच्या कटिबद्धतेचा आम्ही या ठिकाणी पुनरुच्चार करीत आहोत. या स्वयंपाकघराचे प्रायोजकत्व घेतल्याबद्दल आणि त्यातून विद्यार्थ्यांची भूक भागविण्याच्या आमच्या प्रयत्नांना पाठिंबा दिल्याबद्दल मी ‘वेस्टब्रिज कॅपिटल’चे सह-संस्थापक व व्यवस्थापकीय संचालक संदीप सिंघल आणि त्यांच्या पथकाचेही आभार मानू इच्छितो.”

श्री. दासा पुढे म्हणाले, “सर्व भागधारकांचे असे सहकार्य मिळाले, तर आम्ही नक्कीच आमच्या ध्येयाच्या जवळ जाऊ. शिक्षण आणि अन्न यापैकी एक कुठला तरी पर्याय निवडण्याची गरज मुलांना राहणार नाही, असे जग निर्माण करण्याचे आमचे ध्येय आहे. गेल्या २१ वर्षात मुलांची आणि समाजाची सेवा करण्याच्या आमच्या प्रयत्नांना सतत पाठिंबा दिल्याबद्दल मी भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाचे (एमओई) आभार मानू इच्छितो.”

अक्षयपात्र ही संस्था शालेय माध्यान्ह भोजन कार्यक्रमासाठी उत्तर प्रदेश सरकारची अंमलबजावणी भागीदार आहे. नवीन स्वयंपाकघर सुरू करून फाउंडेशन हा कार्यक्रम वाराणसीमध्ये राबवणार आहे.

नवीन स्वयंपाकघरामध्ये जागतिक दर्जाच्या उत्पादन पद्धती व स्वच्छता, अन्न सुरक्षा व गुणवत्ता यांच्या सर्वोच्च मानकांचे पालन होईल. येथे पौष्टिक माध्यान्ह भोजन तयार केले जाईल आणि या भागातील मुलांना वितरित केले जाईल. येथे एका तासात ४० हजार रोटी बनविणारे रोटी मशीन, हायड्रॉलिक सिस्टीम असलेली ७०० लिटर क्षमतेची भाताची कढई, स्वयंचलित मोटर लावलेली १२०० लिटर क्षमतेची डाळ शिजवणारी कढई आणि पाणी शुद्धीकरणासाठी ‘आरओ प्लॅंट’ अशी यंत्रसामग्री उपलब्ध आहे.

शाश्वतता ही संकल्पना राबविण्याच्या हेतूने अक्षयपात्र ही संस्था वीज उत्पादनासाठी सौर पॅनेलचा वापर करील. तसेच हीट पंप व सोलर वॉटर हीटर यातून पाणी गरम करून ते स्वयंपाकासाठी वापरले जाईल.

‘एमडीएम’च्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करून आणि स्थानिक पदार्थ उपलब्ध करून देण्याच्या प्रथेनुसार, ‘अक्षयपात्र’च्या वाराणसीमधील मेनूमध्ये मिक्स्ड व्हेज सोया मसाला, छोले मसाला, राजमा मसाला, रोटी, जिरा राईस, साधा भात, व्हेज पुलाव, मसाला भाजी पुलाव, खीर आणि एक फळ यांचा समावेश असणार आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

मुंबईत राष्ट्रवादी शरद पवार गटाचा महायुतीला पाठिंबा, 11 फेब्रुवारीला नव्या महापौरांची निवडणूक

मुंबई- महानगरपालिकेच्या महापौरपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम अखेर जाहीर झाला आहे....

शहराचं बदलणार रूप … शहर परिवर्तन कक्षाची बैठक संपन्न.

पुणे- वाढता शहरच्या वाढत्या समस्यांना फक्त तोंड द्यायचे नाही...

कर्नाटक पर्यटनाला चालना देण्यासाठी पर्यटन मंत्रालयाने पुण्यात देशांतर्गत पर्यटन बी 2 बी रोड शोचे आयोजन

पुणे, 5 फेब्रुवारी 2026 केंद्र सरकारच्या पर्यटन मंत्रालयाने, त्यांचे प्रादेशिक...