पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘लता दीनानाथ मंगेशकर’ पुरस्काराने सन्मानित-ठाकरेंची अनुपस्थिती

Date:

मुंबई-पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी पहिला ‘लता दीनानाथ मंगेशकर’ पुरस्कार स्वीकारला. येथील षण्मुखानंद सभागृहात आयोजित एका भव्य सोहळ्यात त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.ठाकरे परिवारातील कोणी यावेळी उपस्थित नव्हते .यावेळी महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, उद्योग मंत्री, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सुभाष देसाई व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आदी नेत्यांसह संपूर्ण मंगेशकर कुटुंबिय उपस्थित होते. लतादीदींचे बंधू ह्रदयनाथ मंगेशकर प्रकृतीच्या कारणास्तव या सोहळ्यापासून दूर राहिले. भारत रत्न लता मंगेशकर यांच्या स्मरणार्थ हा पुरस्कार दिला जात आहे. या पुरस्काराचे यंदाचे हे पहिलेच वर्ष आहे. कला क्षेत्रातील अनेक दिग्गजाची या सोहळ्याला उपस्थिती होती.आदित्य ठाकरे यांनी विमानतळावर पीएम मोदी यांच्या स्वागताला सुभाष देसाई यांच्या समवेत उपस्थिती लावली होती.

पंतप्रधान मोदी आपल्या भाषणात म्हणाले, “संगीत एक साधना आणि भावना आहे. जे अव्यक्त आहे, त्याला व्यक्त करण्याचे शब्द आहे. संगीत तुम्हाला राष्ट्रभक्ती आणि कर्तव्यबोधाच्या शिखरावर पोहचवू शकते. मी सहसा कोणते पुरस्कार घेत नाही, पण जर पुरस्कार लतादीदींच्या नावानं आणि मंगेशकर कुटुंबीयांकडून असेल तर इथे येणं माझं कर्तव्य होतं. आपण सर्वजण नशीबान आहोत की संगीताचे सामर्थ, शक्तीला लतादीदींच्या रुपात आपण पाहीलं. मंगेशकर परिवार पिढ्यांपिढ्या या यज्ञात आपली आहुती देत आलं आहे. माझ्यासाठी तर हा अनुभव खूप मोठा राहिला आहे.”

तसेच, “जवळपास चार-साडेचार दशकं झाली असतील, लतादीदींशी माझा परिचय सुधीर फडकेंनी करून दिला होता. तेव्हापासून आजपर्यंत या परिवारासोबतचे अपार प्रेम आणि असंख्य घटना या माझ्या जीवानाचा भाग बनल्या आहेत. माझ्यासाठी लतादीदी स्वरसम्राज्ञी बरोबच जे सांगताना मला गर्व वाटतो, त्या माझ्या मोठ्या बहीण होत्या. त्यांच्याकडून मला नहेमीच मोठ्या बहिण्याचं प्रेम मिळालं. मी समजतो या पेक्षा मोठं आयुष्याचं सौभाग्य काय असू शकतं. खूप दशकानंतर हा पहिला राखीचा सण असेल जेव्हा दीदी नसेल. मी त्यांचा खूप आदर करायचो, मात्र त्या नेहमी सांगायच्या माणूस आपल्या वयाने नाही तर कार्याने मोठा होतो. जो देशासाठी जेवढं करेल तो तेवढाच मोठा आहे. यशाच्या शिखरावर असताना अशा प्रकारचा विचार पाहिल्यावर आपल्याला त्यांच्या महानतेचा अनुभव येतो. लतादीदी वयाने आणि कर्माने देखील मोठ्या होत्या. लतादीदींनी संगीतात ते स्थान मिळवलं होतं की लोक त्यांना देवी सरस्वतीचं प्रतीरुप मानत होते. त्यांच्या आवाजाने जवळपास ८० वर्षे संगीत जगतात आपला ठसा उमटवला.” असंही यावेळी मोदींनी बोलून दाखवलं.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

झोपडीपट्टीचा विकास हाच खरा आमचा संकल्प — आमदार सुनील कांबळे

— लोहियानगर झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाचे आमदार सुनील कांबळे व...

मिर्चीच्या ‘वेस्ट-हर्ता’ उपक्रमाची आशिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद,पुण्यात भव्य गौरव सोहळा संपन्न

पुणे —सामाजिक स्वच्छतेच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलणाऱ्या रेडिओ मिर्चीच्या...