| दक्षिण गुजरातमधील नवसारीमध्ये ५०० खाटांची क्षमता असलेले, अत्याधुनिक, मल्टीस्पेशालिटी व कॅन्सर हॉस्पिटल कॉम्प्लेक्सखरेलमध्ये सुरु करण्यात आलेल्या उत्कृष्टता केंद्रामध्ये कौशल-निर्माण केंद्र तसेच प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांचा समावेश आहे. |
नवसारी, १० जून, २०२२: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवसारीमध्ये ५०० खाटांची क्षमता असलेल्या, मल्टीस्पेशालिटी व कॅन्सर रुग्णालयांच्या कॉम्प्लेक्सचे तसेच दक्षिण गुजरातमधील खरेल गावामध्ये उत्कृष्टता केंद्राचे उद्घाटन पार पडले, या उत्कृष्टता केंद्रामध्ये एक कौशल-निर्माण केंद्र, प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांचा समावेश आहे. मल्टीस्पेशालिटी आणि कॅन्सर रुग्णालये ही ८ एकर जागेमध्ये वसवण्यात आलेल्या ए एम नाईक हेल्थकेयर कॉम्प्लेक्सचा एक भाग आहेत, यामध्ये कंसल्टंट्स, स्पेशलिस्ट्स, नर्सेस आणि पॅरामेडिकल कर्मचाऱ्यांसाठी निवासी सुविधांचा देखील समावेश आहे. शाळांच्या जवळ विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहे व शिक्षक आणि मुख्याध्यापकांसाठी राहण्याच्या सुविधा पुरवण्यात आल्या आहेत.
याप्रसंगी निराली मेमोरियल मेडिकल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष, परोपकारासाठी सदैव झटणारे, पद्म विभूषणाने सन्मानित करण्यात आलेले ए एम नाईक म्हणाले की, त्यांची स्वतःची परोपकार मूल्ये माननीय पंतप्रधानांच्या जनतेला परवडेल आणि सहज उपलब्ध होतील अशा आरोग्यसेवा, शिक्षण व कौशल प्रशिक्षण उपलब्ध करवून देण्याच्या उद्दिष्टांशी मिळतीजुळती, अनुरूप आहेत.
नाईक यांनी सांगितले, “आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी जी आज याठिकाणी आले याचा मला खूप आनंद होत आहे. भारत आणि भारतातील लोकांच्या सेवेप्रती त्यांची अतीव निष्ठा खरोखरीच प्रेरणादायी आहे. त्यांची ही दृढ निष्ठा इतरांनाही त्याचप्रकारे कार्य करण्यासाठी प्रोत्साहित करते.”
ते पुढे म्हणाले, “गरजू लोकांना मदत पुरवण्याचे काम माझ्या विश्वस्त संस्था यापुढे देखील सुरु ठेवतील आणि लोकांच्या जीवनात सुधारणा घडवून आणत राहतील. या कार्यासाठी मी वचनबद्ध आहे. माझ्या विश्वस्त संस्थांकडून समाजाची सर्वतोपरी सेवा केली जावी यासाठी मी अथक मेहनत करत राहीन.”
नाईक यांनी २००९ मध्ये मध्ये स्थापन केलेल्या दोन विश्वस्त संस्थांनी रुग्णालये, शाळा व कौशल-निर्माण केंद्र सुरु केले आहे. गरजू व्यक्तींना आधुनिक आरोग्यसेवांचा लाभ घेता यावा यावर ‘निराली मेमोरियल मेडिकल ट्रस्ट’चा भर असतो. ‘नाईक चॅरिटेबल ट्रस्ट’मार्फत शिक्षण व कौशल-निर्माण सुविधा पुरवण्याचे कार्य केले जाते.
अत्याधुनिक वैद्यकीय सेवा उपलब्ध करवून देणारी ही रुग्णालये दक्षिण गुजरातसाठी मोठे वरदान ठरणार आहेत. अनेक वेगवेगळ्या, अत्याधुनिक उपकरणांनी सुसज्ज अशी ही रुग्णालये सर्वोत्तम आरोग्यसेवासुविधांच्या तोडीस तोड ठरतील.
निराली मल्टीस्पेशालिटी रुग्णालयामध्ये सर्वसाधारण वैद्यकीय सेवा, सर्वसाधारण शस्त्रक्रिया, कार्डिओलॉजी आणि कार्डिओथोरॅसिक सर्जरी, नवजात बाळे तसेच लहान मुलांवरील वैद्यकीय उपचार, ऑब्स्टट्रिक्स आणि गायनॅकॉलॉजी, ऑर्थोपेडिक उपचार, अतिगंभीर व आघात स्थितीमधील देखभाल सेवा यांच्यासह विविध वैद्यकीय सेवा पुरवल्या जातात.
हेल्थकेयर कॉम्प्लेक्सचा एक भाग असलेल्या निराली कॅन्सर हॉस्पिटलचे भूमिपूजन २०१९ साली माननीय पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात आले होते. २०२१ मध्ये गुजरातच्या माननीय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते याचे उद्घाटन करण्यात आले होते. या रुग्णालयात थ्रीडी मॅमोग्राफी, एक्सरे सुविधा तसेच न्यूक्लियर औषधांचा वापर करण्याच्या सुविधा यांच्यासह अनेक अत्याधुनिक सुविधा उपलब्ध आहेत.

निराली मेमोरियल मेडिकल ट्रस्ट
वैद्यकीय सेवा क्षेत्रात परोपकारी कार्य करण्यासाठी श्री. ए एम नाईक यांनी आपल्या व्यक्तिगत क्षमतेच्या बळावर निराली मेमोरियल मेडिकल ट्रस्ट या सार्वजनिक धर्मादाय ट्रस्टची स्थापना केली. श्री. नाईक यांच्या नातीचे ‘निराली’ हे नाव ट्रस्टला देण्यात आले आहे जिचे कर्करोगामुळे वयाच्या अवघ्या दुसऱ्या वर्षी दुःखद निधन झाले. श्री. नाईक यांनी गुजरातमधील खरेल येथील सर्वसाधारण रुग्णालयात एक अतिरिक्त विंग उभारून तेथील वैद्यकीय सुविधांमध्ये सुधारणा घडवून आणण्यात देखील मदत केली आहे. ए एम नाईक चॅरिटेबल हेल्थकेयर सेंटर या नावाने मुंबईतील पवई येथे एक नवी सुविधा देखील या ट्रस्टने स्थापन केली आहे. मुंबईतील जनतेला परवडण्याजोग्या किमतींमध्ये सर्वोत्तम दर्जाच्या वैद्यकीय देखभाल सेवा पुरवण्याचे कार्य याठिकाणी केले जाते.
नाईक चॅरिटेबल ट्रस्टसमाजातील वंचित समुदायांना उत्तम दर्जेदार शिक्षण सेवासुविधा पुरवण्याचे कार्य नाईक चॅरिटेबल ट्रस्टमार्फत (एनसीटी) केले जाते.

