मुंबई : भारतीय जनता पार्टीचे सर्व नगरसेवक आगामी विधानसभा निवडणुकीत आपल्या वाॅर्ड व्यतिरिक्त दुसऱ्या वाॅर्ड मध्येही पक्षाची महत्त्वपूर्ण भूमिका बजावतील. मुंबई भाजप अध्यक्ष मंगलप्रभात लोढा यांनी सर्व नगरसेवकांना यासंदर्भात कार्य प्रक्रिया सुनिश्चित करून एक योजना आखण्याचे निर्देश दिले आहेत. अध्यक्ष लोढा यांच्या नेतृत्वात पार पडलेल्या या बैठकीत सर्व नगरसेवक तसेच नवनिर्वाचित खासदार मनोज कोटक, भाजप संघटन महामंत्री सुनील कर्जतकर, आमदार पराग अलवणी आणि भारतीय जनता युवा मोर्चाचे महामंत्री मोहित भारतीय या बैठकीला उपस्थित होते.
महानगरपालिका मुख्यालयात सोमवारी सायंकाळी संपन्न झालेल्या बैठकीत भाजपचे सर्व नगरसेवक उपस्थित होते. भाजपाध्यक्ष लोढा यांनी नगरसेवकांना संबोधित करताना म्हणाले की, मुंबईच्या प्रत्येक बुथवर भाजपची गतिविधि सुरुवात होणार आहे. ज्यामध्ये नगरसेवकांची महत्वाची भूमिका असणार आहे. मतदान यादीतून बनावटी मतदारांचे नाव कापणे तसेच नवीन युवा मतदारांची नावे मतदार यादीत जोडण्याकरता प्रत्येक स्तरावर पक्षाने बनवलेली योजना लोढा यांनी नगरसेवकांच्या समोर मांडली. लोढा यांनी नगरसेवकांना आवाहन केले आहे की, विधानसभा निवडणुकीआधी प्रत्येक वाॅर्ड मध्ये कार्यकर्त्यांना संघटित करून कोणत्याही परिस्थितीत विजय निश्चित करण्याच्या दृष्टीने लोकांना पक्षाशी जोडून ठेवण्याचे काम नगरसेवकांनी करावे.
या बैठकीत आमदार पराग अलवणी यांनी सामान्य जनतेमध्ये काम करत असताना नगरसेवकांची महत्त्वपूर्ण भूमिका असल्याची चर्चा केली. खासदार झाल्यानंतर पहिल्यांदा महानगरपालिकेत आलेल्या मनोज कोटक यांचे मुंबई भाजप अध्यक्ष लोढा आणि भाजपच्या सर्व नगरसेवकांनी अभिनंदन केले. ते म्हणाले की पक्षाची स्थायी ओळख निर्माण होण्याकरता योग्य काम हाती घेतल्याने संघटन मजबूत होईल. या बैठकीत मुंबई भाजपचे शतप्रतिशत नगरसेवक उपस्थित होते. सर्व नगरसेवकांनी एका स्वरात भाजप अध्यक्ष लोढा यांना आश्वस्त केले की, विधानसभा निवडणुकीत भाजपच्या अधिकाधिक जागा निवडून आणण्यासाठी ते सर्वतोपरी करतील.