महाराष्ट्रातील परिवहन सेवेबाबत दक्षिण कोरियाच्या शिष्टमंडळासमोर सादरीकरण

Date:

मुंबई, दि. 19 : महाराष्ट्रातील परिवहन विभागांतर्गत सुरू असलेले महत्त्वाचे प्रकल्प,  परिवहन सेवा, एसटी महामंडळ सेवा, भविष्यात राबविण्यात येणारे प्रकल्प यासंदर्भातील सादरीकरण परिवहन विभागाकडून परिवहनमंत्री ॲड. अनिल परब यांच्या अध्यक्षतेखाली दक्षिण कोरियाच्या शिष्टमंडळासमोर करण्यात आले.

सह्याद्री अतिथीगृह येथे दक्षिण कोरियाच्या कौन्सिल जनरल यांच्यासमवेत शिष्टमंडळासमोर सादरीकरण करण्यात आले. या शिष्टमंडळामध्ये दक्षिण कोरियाचे कौन्सिल जनरल डाँग युंग किम, सांगजिन पार्क, कोत्राचे संचालक श्री. हाँग, कोरिया लँड आणि हाउसिंग कॉपोरेशनचे सँगसू ली यांचा समावेश होता.

राज्यातील परिवहन सेवा अधिक भक्कम करण्यासाठी राज्य शासन प्रयत्न करत आहे. इलेक्ट्रीक व्हेईकलसारख्या प्रकल्पांमध्ये दक्षिण कोरियाने सहकार्य करावे. परिवहन क्षेत्रातील गुंतवणूक,पर्यावरणपूरक परिवहन सेवा या संदर्भात महाराष्ट्र सहकार्य करेल असे यावेळी ॲड. परब यांनी सांगितले.

यावेळी मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव तथा परिवहन विभागाचे अप्पर मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, परिवहन आयुक्त अविनाश ढाकणे व संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

प्रज्ञा सातव यांचा राजीनामा दबावाखाली?:विरोधकांचा विधान परिषदेमध्ये गदारोळ

मुंबई-काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये प्रवेश केलेल्या आमदार प्रज्ञा सातव...

गर्भाशय कॅन्सरशी लढा; 14 वर्षांच्या मुलींना देणार लस:देशभरात मोफत मिळणार लस, जोखीम 85 % घटेल

नवी दिल्ली-केंद्र सरकार या महिन्याच्या अखेरीस देशभरात १४ वर्षांच्या...

प्रभाग व क्षेत्रीय कार्यालयनिहाय आपत्ती  व्यवस्थानाची टीम करा

कर्मचाऱ्यांना ‘एनडीआरएफ’ मार्फत प्रशिक्षण द्या महापौर मंजूषा नागपुरे यांच्या प्रशासनाला सूचना आपत्ती...

काँग्रेसच्या प्रवक्त्याला केलेल्या मारहाणीची खंत नाही:भाजपच्या तुषार दामगुडे यांची स्पष्टोक्ती

मुंबई-भाजप पदाधिकारी तुषार दामगुडे यांनी काँग्रेस प्रवक्ते हनुमंत पवार...