पुणे-यशदाच्या उप महासंचालक प्रेरणा देशभ्रतार यांची अपंग कल्याण आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. देशभ्रतार यांनी या पूर्वी पुणे महापालिकेत अतिरिक्त आयुक्त म्हणून काम पहिले आहे .अपंग कल्याण आयुक्तालयातील अवघ्या ५२ दिवसांचा कालावधी संपवून बालाजी मंजुळे यांनी नंदुरबारच्या जिल्हाधिकारी पदाची सूत्रे सॊमवारी स्वीकारली..
राज्यात सन २००० मध्ये अपंग कल्याण आयुक्तालयाची स्थापना करण्यात अली .त्यानंतर गेल्या साडेअठरा वर्षांमध्ये या आयुक्तालयाने तब्बल १३ अधिकारी पहिले आहेत..त्यातील दोनच अधिकारी आपला कार्यकाल पूर्ण करू शकले आहेत..अपंग कल्याणच आयुक्तालयातील अधिकाऱ्यांच्या वारंवार होणाऱ्या बदल्यांविरोधात विविध संघटनांनी सरकारकडे आपला रोष व्यक्त केला आहे. सोमवारी (दि.२५) अपंग कल्याण आयुयक्तालयाबाहेर कर्णबधिर युवकांना पोलिसांनी मारहाण केल्याची घटना घडली.त्यात खुद्द मुख्यमंत्र्यांना लक्ष घालावे लागले.केंद्र सरकारचा २०१६ चा पनाग हक्क कायद्याची अंमलबजावणी ,दिव्यांग कल्याणकारी योजनांसाठी स्थानिक स्वराज संस्थांना स्वनिधीच्या ५ टक्के निधीचा करावा लागणारा खर्च दिव्यांग रोजगार आणि शिक्षणा विषयीचे प्रश्न अशी आव्हाने नव्याने नियुक्त होत असलेल्या आयुक्तांन समोर असतील