Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

नवीन ‘सिट्रोएन सी5 एअरक्रॉस एसयूव्ही’ची पूर्व-नोंदणी 1 मार्चपासून 50 हजार रुपयांमध्ये.

Date:

पुणे, 27 फेब्रुवारी 2021 : पुण्यामध्ये ‘ला मेझॉन सिट्रोएन’ ही ‘फिजिटल शोरूम’ सुरू करून सिट्रोएन भारतात कामकाज करण्यास सज्ज झाली आहे. वाहन विक्री करण्यासाठी पुण्यातील एका महत्त्वाच्या भागात स्थित असलेली ही शोरूम भारतातील पहिली ‘ला मेझॉन सिट्रोएन’ आहे. ‘सिट्रोएन सी5 एअरक्रॉस एसयूव्ही’ची पूर्व-नोंदणी 1 मार्च 2021 रोजी सुरू होणार आहे, त्यापूर्वीच ही शोरूम सज्ज करण्यात आली आहे. या शोरूममध्ये ग्राहकांना ‘टेस्ट ड्राईव्ह’चा आरामदायी अनुभव आणि विक्रीपश्चात संपूर्ण सेवा मिळेल.

 ला मेझॉन सिट्रोएनमध्ये ….

वाहन वितरणातील पारंपरिक पद्धतींना ‘ला मेझॉन सिट्रोएन’मध्ये फाटा देण्यात येईल. येथील प्रसन्न, सौहार्दपूर्ण व रंगीबेरंगी वातावरणामुळे अगदी घरी असल्यासारखी आरामदायी भावना ग्राहकांच्या मनात निर्माण होते. शोरूमच्या दर्शनी भागात एक भलामोठा स्क्रीन उभारल्याने पादचाऱी त्याकडे आकर्षित होऊन त्यांना शोरूमच्या आत यावेसे वाटणार आहे. शोरूमची अंतर्गत सजावटही अगदी प्रसन्न स्वरुपाची, नैसर्गिक लाकडी फिनिश असणारी व रंगीत कोरीवकाम असणारी आहे. ‘सिट्रोएन’ ब्रॅंडचा आणि त्याच्या शतकाभराचा वारसा अनुभव देण्यास ही शोरूम ग्राहकांना जणू आमंत्रित करते.

 येथील संपूर्ण डिजिटल इकोसिस्टीममुळे ग्राहकांना अखंडपणे डिजिटल अनुभव घेता येईल. तसेच, ‘एटीएडब्ल्यूएडीएसी रिसेप्शन बार’, ‘हाय डेफिनिशन थ्री-डी कन्फिगरेटर’, ‘सिट्रोएन ओरिजिन्स टचस्क्रीन’ यांच्या माध्यमातून त्यांचा शोरूममधील प्रवास समृद्ध होईल.

 भारतासाठी 360 अंशातील आरामदायीपणा उपलब्ध करण्याच्या धोरणाचा एक भाग म्हणून, ग्राहकांनी यापूर्वी कधीही अनुभवला नसेल असा अतुलनीय आरामशीरपणा त्यांना देऊन, त्यांच्या मनात विश्वास निर्माण करण्यासाठी ही शोरूम विविध सेवा देणार आहे. या सेवांमध्ये ‘सिट्रोएन फायनान्स अँड इन्शुरन्स’द्वारे आकर्षक वित्तपुरवठा व लीज सेवा, तसेच 30 मिनिटांत व्यवहार पूर्ण करण्याची हमी यांचा समावेश असेल.

 ल अटेलिए सिट्रोएन,  विक्रीपश्चात सेवा देणारे वर्कशॉप, हे नाविन्यपूर्ण सेवा अगदी तात्काळ देईल. उदा., 

·         कधीही कोठेही प्रवेश

·         व्हर्च्युअल रिमोट डायग्नोस्टिक्स

·         180 मिनिटांमध्ये आरएसएची हमी

·         पिकअप व ड्रॉप यांसह नियमित सेवा व देखभाल

·         24 तासांच्या आत अस्सल स्पेअर पार्ट्सची उपलब्धता.

सर्व्हिस ऑन व्हील्स या सेवेतून ग्राहकांना समाधानकारक अनुभव मिळेल. यामध्ये त्यांच्या दारी जाऊन सेवा किंवा दुरुस्तीची कामे करून देण्यात येतील. 

 “ला मेझॉन सिट्रोएनविषयी बोलताना सिट्रोएन इंडिया’च्या सेल्स अ‍ॅण्ड मार्केटिंग विभागाचे वरिष्ठ उपाध्यक्ष रोलँड बुशाहा म्हणाले, “ला मेझॉन सिट्रोएन नाविन्यपूर्ण रितीने भारतात सुरू करताना आम्ही खूप उत्साहीत आहोत. सी5 एअरक्रॉस एसयूव्ही ही आमची पहिली कार सादर करण्याच्या मार्गात, पुणे फिजिटल शोरूम हा एक महत्त्वाचा टप्पा आहे. या शोरूममध्ये अनेक स्क्रीन्स असतील. त्यातील ‘एटीएडब्ल्यूएडीएसी’ (एनीटाईमएनीव्हेअरएनीडिव्हाईसएनीकंटेन्ट) अनुभव व अनोखा ‘हाय डेफिनिशन थ्री-डी कन्फिगरेटर’ यांमुळे ग्राहकांना उत्पादनाचा 360 अंशातून दृष्यात्मक अनुभव घेता येईल आणि आपले उत्पादन व त्याविषयीची सेवा यांची निवड करता येईल.”

 भारतातील वितरकांच्या नेटवर्क उभारणीविषयी ‘सिट्रोएन इंडिया’च्या सेल्स अँड नेटवर्क विभागाचे उपाध्यक्ष जोएल वेरनी म्हणाले, “सिट्रोएन’मध्ये आरामदायीपणा व डिजिटल नाविन्यता यांना मोठे महत्त्व आहे. ‘ला मेझॉन सिट्रोएन फिजिटल शोरूम्स’च्या माध्यमातून, कार घेऊ इच्छिणाऱ्या भारतीय ग्राहकाच्या खरेदीच्या पद्धतीत एक क्रांती घडवू शकू, असा आम्हाला विश्वास आहे. ‘सी5 एअरक्रॉस एसयूव्ही’च्या सादरीकरणाच्या वेळी, भारतातील 10 प्रमुख शहरांमध्ये ‘ला मेझॉन सिट्रोएन’तर्फे ग्राहकांचे स्वागत करण्यात येईल.

सिट्रोएन ब्रॅंडबद्दल :

वाहन उद्योगात केंद्रस्थान मिळवलेल्या ‘सिट्रोएन’ने 1919 पासून आपला ब्रॅंड लोकप्रिय करण्याची किमया घडवली आहे. यामध्ये लोक आणि त्यांची जीवनशैली यांना या कंपनीने पहिल्यापासून प्रेरणास्थान दिले आहे. “आपल्याद्वारे प्रेरित”या घोषवाक्यातून चैतन्य मिळवीत आणि आपल्या कार्समध्ये अनोखे डिझाईन व मापदंडानुसार आरामदायीपणा सादर करून, ‘सिट्रोएन’ने प्रमुख ब्रॅन्ड्सच्या मांदियाळीत स्वतःला नेऊन ठेवले आहे. यामध्ये ग्राहकांना मिळत असलेला अनोखा अनुभव हा अतिशय मोलाचा ठरतो (सिट्रोएन अॅडव्हायजर, ला मेझॉन सिट्रोएन, आदी). 2019 या वर्षभरात ‘सिट्रोएन’ने 90 हून अधिक देशांमध्ये 10 लाख गाड्यांची विक्री केली आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सज्ज आहे – प्रशांत जगताप

पुणे- होणार… होणार.. म्हणता म्हणता पुणे महानगरपालिकेची निवडणूक अखेर...

महायुतीतून पुण्या पिंपरीत अजितदादा कशासाठी बाहेर ? मविआला धोबीपछाड करण्यासाठी ?

पुणे- महापालिका निवडणुका जाहीर होताच आज पुण्यात मुख्यमंत्री देवेंद्र...

पुणे महापालिका निवडणुकीसाठी कॉंग्रेसच्या समन्वय समिती प्रमुखपदी रमेश बागवे

पुणे- येथील महानगरपालिका निवडणुकीसाठी समन्वय समिती गठीत...

इनव्हेलियर इंडिया व राष्ट्रवादी कामगार युनियनमध्ये वेतन करार

पुणे — रांजणगाव येथील इनव्हेलियर इंडिया प्रायव्हेट लिमिटेड आणि...