मुंबईदि.६ जुलै – मुंबई व मुंबई उपनगरात रखडलेल्या पुनर्विकास प्रकल्पातील सदनिकाधारकांना विकासकांकडून भाडे दिले जात नाही आणि घरही मिळत नाही. सोन- नाणं गहाण ठेवुन, कर्ज काढून त्यांना भाडं भरावं लागत आहे, हे दुदैवी असुन सरकारने याबाबत तातडीने तोडगा काढून रखडलेले पुनर्विकास प्रकल्प मार्गी लावावेत आणि भाडे सदनिकाधारकांना मिळवून द्यावे, अशी आग्रही मागणी विधान परिषद विरोध पक्षनेते प्रविण दरकेर यांनी सभागृहात केली. सभापती महोदयांनी याची गांभिर्याने दखल घेऊन सरकारला सर्व संबंधितांची तातडीने बैठक आयोजित करण्याचे निदेश दिले.
विधान परिषदेत आज विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी रखडलेले पुनर्विकास प्रकल्पाविषयी असणाऱ्या समस्या सभागृहात मांडल्या. या संदर्भात दरेकर म्हणाले की, रखडलेल्या पुनर्विकास प्रकल्पातील सदनिकाधारकांना विकासकांकडून भाडे दिले जात नाही. राहणारी लोकं गरीब सर्वसाधारण मराठी कुटुंबातील, वर्षानुवर्षे मुंबईत रहाणारे आहेत. SRA चे पुनर्विकास होत आहे, तीन- चार वर्ष रहिवाश्यांना विकासकांकडून भांडे मिळत नाही. भाडेकरूचे भाडे थकल्यामुळे त्यांना त्रासाला सोमोरे जाव लागत आहे. शासनाने लक्ष देऊन भाडी मिळवून द्यावी व भाडेकरू बेघर होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे मत दरेकर यांनी सभागृहात मांडले.
सरकारने याबाबत तातडीने तोडगा काढून रखडलेले पुनर्विकास प्रकल्प मार्गी लावावेत आणि भाडे सदनिकाधारकांना मिळवून द्यावे, अशी आग्रही मागणी आज सभागृहात केली.
रखडलेल्या गृहनिर्माण पुनर्विकास प्रकल्पातील सदनिकाधारकांना तातडीने भाडे द्यावे-प्रविण दरकेर यांची मागणी
Date:

