जुन्नर – (संजोक काळदंते)
मानवी हक्क संरक्षण आणि जागृती संस्थेच्या राज्य संघटन सचिवपदी आळेफाटा (ता.जुन्नर) येथील प्रशांत मनोहर भद्रीगे यांची नुकतीच निवड झाल्याचे पत्र त्यांना संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष विकास कुचेकर यांनी नुकतेच पुणे येथे झालेल्या मानवी हक्क संरक्षण व कायदा जनजागृती अभियान या कार्यक्रमात दिले.
नुकताच संस्थेच्या माध्यमातून पुणे व पिंपरी-चिंचवड शहरात हे अभियान राबविले जाणार आहे.मानवी अधिकाराबरोबर कर्तव्याची जनजागृती करण्याच्या उद्देशाने हे अभियान राबविले जाणार असल्याचे राष्ट्रीय अध्यक्ष विकास कुचेकर यांनी सांगितले. याचे यावेळी विधानपरिषद सदस्य अॅड.जयदेवराव गायकवाड,पुणे म.न.पा.चे.उपमहापौर मुकारी अलगुडे,महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे सरचिटणीस विश्वासराव आरोटे,नगरसेवक दत्ता बहिरट,कौटुंबिक न्यायालय पुणे येथील समुपदेशिका स्मिता जोशी,अॅड रुपाली वाईकर,अॅड.सतीश एरम,अॅड मनोज किरमे,अॅड श्रीकांत तांबे,पी.एस.आय.साबळे,संस्थेचे पुणे जिल्हाउपाध्यक्ष संजोक काळदंते हे उपस्थित होते मान्यवरांच्या हस्ते प्रशांत भद्रीगे यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी बोलताना अॅड.जयदेवराव गायकवाड यांनी सांगितले कि संविधानाने प्रत्येक माणसाला अनेक अधिकार दिले आहेत या अधिकारांचा उपयोग सर्वांनी करून घ्यायला हवा मात्र या करिता जनजागृती होणे गरजेचे आहे.तर मानवी हक्क संरक्षण आणि जागृती ही संस्था जे कार्य करीत आहे त्याचे त्यांनी कौतुक केले.
यावेळी ‘’कौटुंबिक हिंसाचारापासुन संरक्षण व कायदा ‘’या विषयावर चर्चासत्र झाले उपस्थित वकील आणि मान्यवरांनी यात सहभाग घेतला होता.यामध्ये उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात आले.कार्यक्रमाचे आयोजन एम.एम.जी.फौंडेशन अध्यक्षा परवीन लालबिगे यांनी केले होते,प्रास्ताविक संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष विकास कुचेकर यांनी केले,मान्यवरांचे स्वागत सतीश लालबिगे यांनी,सुत्रसंचलन ललित केदारे यांनी केले सदर कार्यक्रमासाठी संस्थेच्या राज्य उपाध्यक्षा संजना कपूर,सचिव सोमनाथ सावंत,सल्लागार अनिल कदम यांनी विशेष परिश्रम घेतले.
मानवी हक्क संरक्षण आणि जागृती संस्थेच्या राज्य संघटन सचिवपदी प्रशांत भद्रीगे
Date:


