पुणे- महापालिकेच्या शहर सुधारणा समिती अध्यक्षपदी प्रसन्न जगताप, उपाध्यक्षपदी शीतल सावंत, क्रीडा समिती अध्यक्षपदी विरसेन जगताप, उपाध्यक्षपदी छाया मारणे, महिला बालकल्याण समिती अध्यक्षपदी माधुरी सहस्त्रबुद्धे, उपाध्यक्षपदी वृषाली चौधरी, विधी समिती अध्यक्षपदी मनीषा लडकत, उपाध्यक्षपदी मनीषा कदम यांची निवड झाली आहे.
या चारही समित्यांवर भाजपचे स्पष्ट बहुमत आहे. भाजपच्या चारही उमेदवारांना प्रत्येकी 8 तर, महाविकास आघाडीच्या उमेदवारांना प्रत्येकी 5 मते मिळाली. या समित्यात भाजपचे 8, राष्ट्रवादी 3, काँग्रेस आणि शिवसेना प्रत्येकी 1-1 सदस्य आहेत.
भाजपच्या विजयी उमेदवारांचा महापौर मुरलीधर मोहोळ, माजी सभागृह नेते श्रीनाथ भिमाले,उपमहापौर सरस्वती शेंडगे, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, सभागृह नेते धीरज घाटे, , नगरसेवक प्रविण चोरबेले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. या निवडणुकीसाठी समाजकल्याण आयुक्त प्रशांत नारनवरे पीठासीन अधिकारी म्हणून तसेच प्रभारी नगरसचिव शिवाजी दौंडकर उपस्थित होते.

