पुणे-महिंद्रा थिएटर एक्सलन्स अॅवॉर्ड ( मेटा ) २०१८ सोहळ्यामध्ये यंदा ज्येष्ठ चित्रपट आणि नाट्य दिग्दर्शिका विजया मेहता यांना ( मेटा ) २०१८ जीवनगौरव पुरस्कारष् देऊन गौरविण्यात येणार आहेण् विजया मेहता या नामवंत दिग्दर्शिका असण्याच्या जोडीला १९६०च्या दशकातील प्रायोगिक रंगभूमीवरील आघाडीचे व्यक्तिमत्व आहेत तसेच त्यांनी रंगायन या नाट्य कला अकादमीची स्थापना केलेली आहे.
मेटा सोहळ्याचे हे १३ वे वर्ष असून यंदा परीक्षक मंडळामध्ये नाट्य आणि चित्रपट क्षेत्रातील दिग्गज मंडळींचा समावेश आहे. सुप्रसिद्ध नाट्यदिग्दर्शक आणि राष्ट्रीय कला अकादमी एनएसडीद्धच्या माजी संचालिका अमल अल्लानाए लोकप्रिय चित्रपट आणि नाट्य अभिनेत्री लिलीएट दुबे नाट्य दिग्दर्शिका नीलम मानसिंग चौधरी चित्रपट निर्माते अभिनेते लेखक आणि नाट्य दिग्दर्शक रजत कपूर नामवंत छायाचित्रकार शास्त्रीय नृत्यकलाकार आणि शाम भारतीय कला केंद्राच्या संचालिका शोभा दीपक सिंग यांनी यंदा मेटा पुरस्कारांसाठी परीक्षक म्हणून काम पहिले.