दि निकलोडियन किड्स चॉईस अॅवॉर्ड्स हा देशातील एकमात्र असा पुरस्कार सोहळा आहे ज्यामध्ये ऑरेंज निकलोडियन ब्लिम्प साठी मुलांनी मतदान करून ताऱ्यांची निवड केली आहे. जवळजवळ २.५ लाख मुलांनी आपल्या आवडत्या कलाकारासाठी मतदान करून आपल्या आवडीच्या कलाकाराला निवडून दिले आहे. गोलमाल अगेन ला बेस्ट फिल्म विभगाचा पुरस्कार मिळाला असून रणवीर सिंग ला सर्वोत्कृष्ट अॅक्टर (पुरूष) चा पुरस्कार मिळाला. आलिया भट्ट ला सर्वोत्कृष्ट अॅक्ट्रेस (महिला) पुरस्कार तिच्या बदरी की दुल्हनिया गाण्यातील अभिनयासाठी तर या गाण्याला देशभरांतील प्रसिध्दी नंतर सर्वोत्कृष्ट गाण्याचा पुरस्कार मिळाला. वरूण धवनला मुलांनी बेस्ट डान्सिंग स्टार व बेस्ट एन्टरटेनर ऑफ दी इयर पुरस्कार देण्यात आले. मोटू पतलू या शोला मुलांची सर्वाधिक मते मिळाल्याने या कार्यक्रमाला बेस्ट शो ऑन किड्स चॅनलचा पुरस्कार देण्यात आला. मोटू पतलू ला बेस्ट इंडियन कार्टुन कॅरेक्टर ऑफ दी इयर पुरस्कारही देण्यात आला.
सिताऱ्यांच्या उपस्थितीत निकलोडियन किड्स चॉईस अॅवॉर्ड्स
Date:
पुणे – भारतातील मुलांसाठी असलेल्या एकमात्र अशा आणि मुलांसाठी असलेल्या अशा डाबर रेड पेस्ट प्रस्तूत निकलोडियन किड्स चॉईस अॅवॉर्ड्स २०१७ चे फिल्म आणि टेलिव्हिजन क्षेत्रातील पुरस्कारांचे वितरण आज करण्यात आले. यावेळी बॉलिवूड आणि टेलिव्हिजन क्षेत्रातील विविध सिताऱ्यांनी आपली हजेरी लावली, यामध्ये आलिया भट्ट, रणविर सिंग, वरूण धवन, किर्ती सॅनोन, बादशहा, शंतनू महेश्वरी, धर्मेश सर आणि अशा अनेक व्यक्तिंनी प्रसिध्द अशा ऑरेंज कार्पेट वरून प्रवेश केला. विविध तारे तारकांनी भरलेल्या या संध्याकाळी अनोखे कार्यक्रम तसेच जादुई प्रसंग पाहिले जे आता लोकांसाठी अविस्मरणीय ठरतील.

