रेनॉ इंडिया ही कंपनी नुकताच ५,००,००० वाहनांच्या विक्रीचा टप्पा पार करून, हे यश सर्वाधिक वेगाने साध्य करणाऱ्या ऑटोमोटिव ब्रॅण्ड्सच्या गटात जाऊन बसली आहे. भारत ही रेनॉसाठी महत्त्वाची बाजारपेठ असून कंपनीकडे एक स्पष्ट असे दीर्घकालीन ‘भारत धोरण’ आहे.
अगदी थोड्या कालावधीत रेनॉने भारतात लक्षणीय प्रगती केली आहे. यामध्ये अत्याधुनिक उत्पादन कारखाना, जागतिक दर्जाचे तंत्रज्ञान केंद्र यांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे भारतात दोन डिझाइन सेंटर्स असलेला हा एकमेव जागतिक ब्रॅण्ड आहे. या भक्कम पायाला जोड लाभली आहे ती अनोख्या उत्पादन धोरणाची आणि ग्राहकांच्या समाधानासाठी घेण्यात आलेल्या अभिनव उपक्रमांची. रेनॉने साध्य केलेल्या यशात या सर्व घटकांचा निर्णायक वाटा आहे..
विक्रीतील हा महत्त्वाचा टप्पा साजरा करण्यासाठी रेनॉने अनेक आकर्षक ऑफर्स आणल्या आहेत. क्विडवर रेनॉने इतर लाभांव्यतिरिक्त एक विशेष वित्तसहाय्याची ऑफर ० टक्के व्याजदराने देऊ केली आहे. ही ऑफर मर्यादित काळासाठी असेल. ९८ टक्के स्थानिकीकरणातून उत्पादित होणारी क्विड म्हणजे ‘मेक इन इंडिया’ची आजपर्यंतची सर्वांत यशस्वी गाथा आहे. भारतातील छोट्या कार्सच्या विभागात क्विडने क्रांती घडवून आणली आहे. ही आकर्षक, कल्पक आणि परवडण्याजोगी कार रेनॉ इंडियासाठी खऱ्या अर्थाने पट बदलून टाकणारी तसेच वाढीला चालना देणारी ठरली. या गाडीची २,७५,००० युनिट्स आतापर्यंत विकली गेली आहेत. क्विडचे यश आणखी पुढे नेत रेनॉ इंडियाने अलीकडेच नवीन क्वीड २०१८ फीचर लोडेड रेंज आणली आहे. ही रेंज मॅन्युअल आणि ऑटोमेटेड अशा दोन्ही ट्रान्समिशन पर्यायांत उपलब्ध आहे.