अनाथ मुले , दृष्टिहीन, वृध्द महिला व बालकांना दिवाळी फराळ आणि शंभर किलो धान्य वाटप भेट !
‘प्रबोधन माध्यम संस्थेच्या सहाव्या वर्षाच्या उपक्रमाला चांगला प्रतिसाद
पुणे :
‘प्रबोधन माध्यम’ या संस्थेतर्फे ‘सर्वधर्मीय आणि कृतज्ञ दिवाळी’ या उपक्रमाचे यावर्षी ‘पंडिता रमाबाई मुक्ती मिशन’ (केडगाव, ता. दौंड) येथे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमाचे हे सहावे वर्ष होते.दिवाळीच्या ‘वसूबारस’ या पहिल्या दिवशी हा उपक्रम केडगाव, तालुका दौंड येथील ‘पंडिता रमाबाई मुक्ती मिशन’ मधील सातशे अनाथ मुले , द्र्ष्टी हीन व वृद्ध महिला व बालकांसमवेत समवेत साजरा झाला.
‘प्रबोधन माध्यम’चे संस्थापक दीपक बिडकर, संचालक गौरी बिडकर, मिशनचे माजी अध्यक्ष मार्कस देशमुख, सारीका रोजेकर, सचिन सुर्यवंशी यांच्या हस्ते महिलांना व अनाथ मुलांना दिवाळी फराळाचे वाटप करण्यात आले. तसेच प्रबोधन माध्यम संस्थेच्या वतीने ‘पंडिता रमाबाई मुक्ती मिशन’ च्या अन्न कोठाराला मदत म्हणून शंभर किलो धान्य देण्यात आले.
पंडिता रमाबाई मुक्ती मिशनमध्ये झालेल्या कार्यक्रमाला ‘महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटी’चे अध्यक्ष, पी.ए.इनामदार, मिशनचे माजी अध्यक्ष मार्कस देशमुख, प्रबोधन माध्यमचे संस्थापक दीपक बिडकर, संचालक गौरी बिडकर,मिशन चे संचालक लॉरेन फ्रान्सिस , उप संचालक अनिल फ्रान्सिस , मुख्याध्यापिका प्रमिला डोंगरे , सारीका रोजेकर, सचिन सुर्यवंशी उपस्थित होते.
दिवाळी हा आनंदाचा कृतज्ञतेचा सण आहे. त्यात सर्व धर्मियांना, सर्व समाज घटकांना सहभागी करून घ्यावे या उद्देशाने या विशेष उपक्रमाचे आयोजन सलग पाच वर्षापासून केले जात आहे. या उपक्रमातंर्गत आत्तापर्यंत गरीब, अनाथ विद्यार्थी, कचरावेचक, काश्मीरमधील विद्यार्थी, मदरसामधील विद्यार्थी, वृत्तपत्र विक्रेते, बॅक स्टेज आर्टीस्ट, सामाजिक कार्यकर्ते आदी समाजातील विविध घटक सहभागी झाले आहेत.