पुणे-अँग्लो उर्दू गर्ल्स हायस्कूलचा वार्षिक सांस्कृतिक आणि पारितोषिक वितरण कार्यक्रम नुकताच पार पडला. नगरसेविका फरझाना आयुब इलाही यांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिके देण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अँग्लो उर्दू गर्ल्स हायस्कूलच्या माजी प्राचार्य आणि ‘पै आय.सी.टी.अॅकॅडमी’ च्या संचालक मुमताज सय्यद होत्या.
सांस्कृतिक कार्यक्रमात विद्यार्थ्यांच्या विविध गुणदर्शनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी यामध्ये नृत्य, नाटिका सादर केली.
शैक्षणिक वर्षातील विविध खेळांतील आणि विविध विषयांमधील अव्वल विद्यार्थ्यांना प्रमुख पाहुणे नगरसेविका फरझाना आयुब इलाही आणि अँग्लो उर्दू गर्ल्स हायस्कूलच्या प्राचार्य आएशा शेख यांच्या हस्ते प्रशस्तीपत्रक आणि पारितोषिके देण्यात आली. यावेळी पर्यवेक्षक कर्मचारी शबनम खान, झैनाब उसमान सय्यद आणि शाहिन इरफान शेख उपस्थित होते.
प्राचार्य आएशा शेख यांनी राष्ट्रीय स्तरातील शाळेच्या यशाबद्दल, शाळेचे राष्ट्रीय खेळाडू आणि शैक्षणिक वर्ष 2017-18 मधील सर्वोत्कृष्ट शिक्षक याबद्दल माहिती दिली.