’ऑनर युवर डॉक्टर ‘ अभियानास प्रारंभ
पुणे :सेवाभाव,आदर असलेल्या वैद्यकीय व्यवसायाबद्दल समाजाने आपला दृष्टिकोन सकारात्मक करावा यासाठी ‘ऑनर युवर डॉक्टर ‘ या अभियानाला शनिवारी प्रारंभ झाला
बालरोगतज्ज्ञांच्या परिषदेत डेल क्युअर लाईफ सायन्सेस चे व्यवस्थापकीय संचालक पी के पाठक यांच्या हस्ते अभियानास प्रारंभ झाला . अनुभव कथन ,पोष्टर सादरीकरण ,गटचर्चा या माध्यमातून हे अभियान होणार आहे .
यावेळी बोलतांना पी के पाठक म्हणाले ,’डॉक्टरांवर होणारे हल्ले चिंताजनक आहेत . वैद्यकीय व्यवसाय हा जीवनदायी आहे . समाजाची काळजी घेणाऱ्या डॉक्टरांबद्दल आपली मानसिकता सकारात्मक असली पाहिजे .
‘ऑनर युवर डॉक्टर ‘ अभियानातून आम्ही वैद्यकीय व्यवसायाची सकारात्मक बाजू समोर आणणार आहोत . समाजाने केवळ नकारात्मक बाजू न पाहता ,सकारात्मक गोष्टींवर विश्वास ठेवला पाहिजे . आरोग्य वाढावे आणि आयुर्मान वाढावे यासाठी कार्यरत वैद्यकीय व्यावसायिकांना समाज घटकांकडून भीती वाटणार नाही ,याची काळजी घेतली पाहिजे ‘ असेही ते म्हणाले जे डब्ल्यू मेरियट येथे झालेल्या या वैद्यकीय परिषदेला देशातून शेकडो डॉक्टर उपस्थित होते