१५०० गरजूंपर्यंत जीवनोपयोगी साहित्यची मदत

Date:

पुणे:

युवक क्रांती दल आणि   रोटरी क्लब ऑफ पुणे, स्पोर्टस् सिटी (औंध) तर्फे १ एप्रिल पासून कोरोना लॉकडाऊन काळात अडचणीत आलेल्या गरजूंपर्यंत जीवनोपयोगी साहित्य आणि किराणा सामानाची मदत पोहोचविण्यात आली.

२० दिवसात सुमारे १५०० गरजूंपर्यंत सुमारे साडे चार लाख खर्चून हे मदतकार्य करण्यात आले. अनेक संस्था आणि नागरिकांनी आर्थिक मदत करून उभारलेल्या निधीतून हे मदत कार्य करण्यात आले.  ३०० रूपयात एका व्यक्तीला आठवडाभर पुरेल एवढे किराणा सामान देता येते,अशा अंदाजावर आधारित ३०० रुपये देणगी देण्याचे आवाहन सोशल मीडिया वरून करण्यात आले होते. कात्रज,पानमळा,कोंढवा,मुंढवा,भवानी पेठ ,न्यु कोपरे,वारजे माळवाडी,सदाशिव पेठ,काळेपडळ,दापोडी,येरवडा,गणपतीमाथा,एरंडवणे,पिंपरी चिंचवड ,मोमीनपूरा,वडगाव,सुखसागरनगर ,न-हे ,सुसगाव,धायरी,फुरसूंगी या ठिकाणी हे मदतकार्य करण्यात आले.

डॉ.कुमार सप्तर्षी यांच्या मार्गदर्शनाखाली  संदीप बर्वे,जांबुवंत मनोहर,सचिन चौहान, मुख्तार मणियार,सचिन पांडूळे  मशाल संस्थाचे पदाधिकारी  शरद महाजन,रोटरी क्लब ऑफ पुणे स्पोर्टस् सिटी औंधचे  अध्यक्ष  विनोद पाटील, संदेश सावंत,सेम्युअल केनडी यांनी या मोहिमेत सहभाग घेतला.

चेक ( धनादेश ) द्यायचा झाल्यास तो ‘ महाराष्ट्र गांधी स्मारक निधी ‘ या नावाने द्यावा.पुढील क्रमांकावर फोन करावा  आणि या कार्यात सहभागी व्हावे .संदीप बर्वे,9860387827,जांबुवंत मनोहर 9028633720 ,सचिन चौहान 9637428888,

देणगी पाठवण्यासाठीचा तपशील

———–
Maharashtra Gandhi Smarak Nidhi
State Bank of India
Kothrud Branch
Kothrud, Pune – 38.
Account no.
52019302096
IFSC Code SBIN0020734

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

‘पुण्याच्या क्रीडा विश्वाला नवा आयाम देणार’:केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ

⁠खासदार क्रीडा महोत्सवाचा पंतप्रधान मोदींच्या मार्गदर्शनाने समारोप पुणे (प्रतिनिधी) :...

मढ्याच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना बाहेर काढू:ठाकरे बंधूंच्या युतीवर फडणवीसांचा घणाघात

मुंबई -महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधूंच्या युतीनंतर राजकीय वातावरण...

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ‘स्टार प्रचारकां’ची फौज मैदानात

महानगरपालिका निवडणुकांसाठी शिवसेनेच्या वक्त्यांची यादी जाहीर मुंबई | दि. २५...