अन्याय झालेल्यांना सामाजिक न्याय मिळवून देण्यासाठी गांधी मार्गाची आवश्यकता : डॉ. टेरी बिटझेल

Date:

‘गांधी आजच्या संदर्भात’ विषयावर  डॉ.टेरी बिटझेल यांचे व्याख्यान 
पुणे:’ ज्यांच्यावर अन्याय होतो, जे वंचित आहेत,त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सामाजिक जबाबदारी स्वीकारून न्यायासाठी गांधीवादी प्रेरणेने संघटित आणि अहिंसक प्रयत्न झाले पाहिजेत. त्यातून समाजाच्या धारणेची पुनर्रचना करणे हे ध्येय असले पाहिजे . गांधीजींचे जीवन कार्य त्या दृष्टीने अभ्यासले पाहिजे’, असे प्रतिपादन महात्मा गांधी सेंटर फॉर ग्लोबल नॉन – व्हायलन्स ‘चे संचालक आणि जेम्स मॅडीसन विद्यापीठातील जस्टीस स्टडीज विषयाचे विभागप्रमुख डॉ.टेरी  बिटझेल यांनी केले.
‘गांधी आजच्या संदर्भात’ या  विषयावर  ‘महात्मा गांधी सेंटर फॉर ग्लोबल नॉन – व्हायलन्स ‘चे संचालक आणि जेम्स मॅडीसन विद्यापीठातील जस्टीस स्टडीज विषयाचे विभागप्रमुख डॉ.टेरी  बिटझेल यांच्या व्याख्यानाला बुधवारी चांगला प्रतिसाद मिळाला. हे व्याख्यान  गांधी भवन कोथरूड येथे  बुधवार दि.११ मार्च २०२० , सायंकाळी ६ वाजता झाले. त्यावेळी डॉ.बिटझेल बोलत होते.
महाराष्ट्र गांधी स्मारक निधी चे अध्यक्ष डॉ. कुमार सप्तर्षी हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते .
डॉ. टेरी बिटझेल म्हणाले, ‘ज्यांच्यावर अन्याय झाला , व्यवस्थेच्या रगाडयात जे मागे पडले, त्यांच्याकडे दुर्लक्ष होता कामा नये. आपण मानवी प्रश्न, समस्यांकडे सहानुभूतीने पाहतो का, हेही तपासले पाहिजे.प्रत्येक व्यक्तीला त्याच्या हक्काचा न्याय मिळालाच पाहिजे.प्रसारमाध्यमांचे त्यात चांगले योगदान असू शकते.
गांधीजींच्या जीवनकार्याबद्दल बोलताना डॉ. टेरी बिटझेल म्हणाले, ‘गांधीजींनी आयुष्यात अनेक प्रयोग केले.
मोठया आव्हानांमध्ये मोठ्या संधी लपलेल्या असतात, हे त्यांना माहित होते.
मी अहिंसेकडे प्रवास करतो, तेव्हा गांधींकडे प्रवास करतो,
इतरांची सेवा हे गांधीजींनी आपले जीवन कर्तव्य मानले होते.
माणूस आता युध्दे करुन थकला आहे. त्याला सैन्यातही जायला नको असते. अहिंसा, शांततेकडे ओढा वाढत आहे, हा गांधी विचारांचा विजय आहे, अमेरिकेतही  डोनाल्ड ट्रम्प यांच्या सर्वच धोरणाबाबत पाठिंबा नाही,असेही डॉ. टेरी बिटझेल यांनी सांगीतले.
अध्यक्षस्थानावरुन बोलताना डॉ. कुमार सप्तर्षी म्हणाले, ‘ परिवर्तनाचा मार्ग अहिंसात्मक असला पाहिजे. सध्या हिंसेने आपल्या हवे ते परिवर्तन घडवून आणण्याचा खटाटोप केला जात आहे. सत्ता आणी हिंसा एकत्र नांदते, लोकशाही अहिंसे बरोबर नांदते, हे सिध्द होते आहे. अहिंसा ही मोठी ताकद असून गांधीजी हे भारतीय परंपरेतून  आलेले सार्वकालिक सर्वश्रेष्ठ व्यक्तिमत्व आहे, हे जगाला मान्य झालेले आहे.
 कार्यक्रमाला डॉ. उर्मिला सप्तर्षी,डॉ. प्रवीण सप्तर्षी, प्रशांत कोठडिया, आशीष जेम्स, जांबुवंत मनोहर  इत्यादी मान्यवर उपस्थित होते. संदीप बर्वे यांनी सूत्रसंचालन केले.
SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

मी खोटं एफआयआर केल्याचे सिद्ध झाले तर मला जेल मध्ये टाका.. रोहित पवार आक्रमक

VSR आणि विमान वाहतूक मंत्र्याचे लागेबांधे बारामती - मी...

व्हीएसआर कंपनीविरोधात गुन्हा दाखल करण्यास नकार:रोहित पवार आक्रमक; कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी

बारामती- राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार...

व्हीएसआर कंपनीविरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी रोहित-युगेंद्र पवार मैदानात:बारामती पोलिस ठाण्यात दाखल; समर्थकांची गर्दी

बारामती- राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार...

दिल्ली पोलिसांवर हिमाचलमध्ये गुन्हा दाखल,हिमाचल पोलीस म्हणाले,इकडे मनमानी नाही चालणार,नाकेबंदी करून थांबवले

शिमला-हिमाचल प्रदेशमध्ये दिल्ली पोलिसांवर बुधवारी एफआयआर (FIR) दाखल करण्यात...