पुणे :भारतीय विद्या भवन, इन्फोसिस फाऊंडेशनतर्फे सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत
‘बोल नुपुरांचे व अंक गणिताचे ‘ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ‘ नृत्यवेध ‘ कथक नृत्य संस्था प्रस्तुत हा कार्यक्रम शनीवार, ७ मार्च रोजी सायंकाळी साडेपाच वाजता झाला.
‘नृत्य वेध ‘ च्या संस्थापिका डॉ. माधुरी आपटे आणि त्यांच्या ४० विद्यार्थिनीनी हा कार्यक्रम प्रस्तुत केला . गणित या अवघड वाटणाऱ्या विषयाची गुंफण नृत्यकलेशी करून मनोरंजनात्मक पध्दतीने रसिकांसमोर सादर केला.
भारतीय विद्या भवन चे सचिव प्रा.नंदकुमार काकिर्डे यांनी प्रास्ताविक केले. विलास पोतनीस यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी ज्येष्ठ समीक्षक मा. कृ. पारधी ( वय वर्षे १००) या वेळी उपस्थित होते.
कथकनृत्यातील गिनती या प्रकारात १ ते ९हे अंक विशिष्ट चढत्या ,उतरत्या क्रमाने म्हणताना
त्यास पायातील नुपुरध्वनींची साथ मिळते. याच कल्पनेतून डाॅ. माधुरी आपटे यांनी संपूर्ण गणितावर आधारित कथकनृत्य सादरीकरणाचे शिवधनुष्य पेलण्याचा प्रयत्न केला .
गणितप्रेमी विलास पोतनीस यांच्या स्वरचित गणिती कवितांचे सादरीकरण नृत्यकलेशी जोड देऊन झाले. या सर्व कवितांना अजय पराड यांनी संगीतबद्ध केले होते.
गणिती फटका, अंकांचे सौंदर्य दाखवणारे गणपती बाप्पा, गणितदेवाची आरती, आयुष्य हेच
गणित आणि एवढेच कशाला तर प्रेम म्हणजे गणितच असतं हे सिद्ध करणा-या कविता रसिकांसमोर नृत्यमाध्यमातून सादर झाल्या.सरस्वती वंदनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली .

