भारती विद्यापीठ अभियांत्रिकी महाविद्यालय येथे महिला दिना निमित्त अॅसिड अॅटॅक वर जागृतीपर पथनाट्य
पुणे :
भारती विद्यापीठाच्या अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये महिला दिना निमित्त अॅसिड अॅटॅक , इव्ह टीझिंग ( छेडछाड ), स्वसंरक्षण या विषयांवर जागृतीपर पथनाट्य, नृत्य,स्फूर्तिगीत गायन, व्याख्यान अशा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
धनकवडी ( सातारा रस्ता ) येथील भारती विद्यापीठ कॅम्पसमध्ये शनीवारी ७ मार्च रोजी सकाळी साडेनऊ पासून हे कार्यक्रम पार पडले. ‘दात्री ‘ संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सोनाली भांडारकर यांनी मार्गदर्शन केले. प्राचार्य डॉ. आनंद भालेराव यांनी स्वागत केले. ‘लिंग समानता आणि महिलांचे हक्क ‘ या संकल्पनेवर कार्यक्रमांची रचना करण्यात आली होती.

