पुणे : ‘देशवासियांकडून मिळणारे आत्मबळ आणि आत्मसन्मान याची खरी गरज सीमेवरील जवानांना असते, सैनिकांच्या
कर्तुत्वाला सलाम करण्यासाठी या उपक्रमासारखे व्यासपीठ वारंवार मिळणे आवश्यक आहे’, असे प्रतिपादन पालकमंत्री गिरीष बापट यांनी केले.
भाजपानगरसेविका सुलोचना तेजेंद्र कोंढरे (प्रभाग क्रमांक 17) आणि ‘जय महाराष्ट्र तरुण मंडळ’, भवानी पेठ यांच्या वतीने आयोजित सीमेवर लढताना हौतात्म्य पत्करणार्या 40 सैनिकांच्या कुटुंबियांच्या सन्मान सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते.
गिरीष बापट बोलताना म्हणाले, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपली दिवाळी सैनिक जवानांबरोबर साजरी केली, त्याप्रमाणे भाजप कार्यकर्ते तेजेंद्र कोंढरे देखील अशा प्रकारचा उपक्रम राबवुन शहीद सैनिकांच्या कुटुंबियांना आधार आणि सन्मान देण्याचे स्तुत्य कार्य करीत आहेत’.
योगेश गोगावले (भारतीय जनता पार्टी शहर प्रमुख), कर्नल संभाजी पाटील आणि समाजसेविका स्वाती चिकलकर यांची भाषणे झाली.
कसबा मतदार संघाचे चिटणीस आणि ‘जय महाराष्ट्र तरुण मंडळ’ चे अध्यक्ष तेजेंद्र नथुराम कोंढरे यांच्या वाढदिवसानिमित्त हा कृतज्ञता सन्मान आणि दिवाळी कार्यक्रम रविवारी जय महाराष्ट्र तरूण मंडळ, भवानी पेठ, पालखी विठोबा चौक येथे सायंकाळी झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी योगेश गोगावले (भारतीय जनता पार्टी शहर प्रमुख) होते. यावेेळी कर्नल संभाजी पाटील, स्थायी समिती अध्यक्ष मूरलीधर मोहोळ, प्रमोद कोंढरे ( भाजपा कसबा सरचिटणीस), छगन बुखाले (भाजपा सरचिटणीस, कसबा मतदार संघ), नगरसेवक राजेश येनपुरे, नगरसेविका आरती कोंढरे, नगरसेवक दीपक पोटे, नगरसेविका मनिषा लडकत, अशोक येनपुरे, वैशाली नाईक (
कसबा महिला आघाडी, अध्यक्ष) मान्यवर उपस्थित होते.राजु परदेशी, सागर शिंदे, पप्पूशेठ कोठारी, संजय देशमुख, राहूल कोंढरे आदी कार्यकत्यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले.
या उपक्रमाचे यंदाचे दुसरे वर्ष होते. भाजपा नगरसेविका सुलोचना तेजेंद्र कोंढरे (प्रभाग क्रमांक 17) आयोजित उपक्रमात सीमेवर लढणार्या सैनिकांच्या कुटुंबीयांचा आणि सीमेंतर्गत चांगली कामगिरी बजावणार्या सैनिकांचा सन्मान करणे हा या उपक्रमाचा प्रमुख हेतू होता.