लोक जनशक्ती पार्टीच्या सदस्य नोंदणी अभियानास प्रारंभ
पुणे:
लोकजनशक्ती पार्टी पुणे शहर जिल्हाच्या सदस्य नोंदणी अभियानाचा प्रारंभ रविवारी पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अशोक कांबळे, पुणे शहराध्यक्ष संजय आल्हाट यांच्या उपस्थित झाला. सदस्य नोंदणी मोहिम प्रसारासाठी तयार करण्यात असलेल्या वाहनाचे वैशाली वाघमारे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. यावेळी झालेल्या बैठकीत नवे पदाधिकारी जाहीर करण्यात आले.
श्रीमती वैशालीताई वाघमारे यांना पुणे शहर संघटक पदी नियुक्तीचे पत्र देण्यात आले. तसेच जितेंद्र पासवान यांना पुणे शहर संघटकपदी व सुरेश सहानी यांना पुणे शहर मजदुर सेलचे अध्यक्षपदी नियुक्तीचे पत्र देण्यात आले. याप्रसंगी पुणे शहर,जिल्हा मधील सर्व प्रमुख कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.