…. बंदुकीतूनही प्रेम बाहेर यावे : उदय प्रकाश

Date:

पुणे:’प्रेम हेच अंतिम सत्य आहे, बंदुकीच्या नळीतून प्रेमच बाहेर पडले पाहिजे, आणि कवीच्या शब्दांना राजकीय सोयींनी पाहू नये’, असे प्रतिपादन साहित्य अकादमी पुरस्कार विजेते कवी उदय प्रकाश(दिल्ली) यांनी रविवारी केले.
‘ भारतीय साहित्य का नया दौर’ या विषयावर उदय प्रकाश  यांच्याशी टिकम शेखावत यांनी संवाद साधला.
‘दकनी अदब फाऊंडेशन ‘आयोजित  डेक्कन लिटरेचर  फेस्टिव्हलच्या तिसऱ्या  दिवशी, रविवार २ फेब्रुवारी रोजी दुपारी पं. नेहरू सभागृह ( घोले रस्ता ) येथे हा कार्यक्रम झाला. रसिकांचा त्याला चांगला प्रतिसाद मिळाला
पहिले महायुद्ध, दुसरे महायुध्द झाले तरी हिंसेने प्रश्न सुटत नाहीत, हे आपल्याला कळलेले नाही. अजूनही कलबुर्गी यांच्यासारख्या लेखकाची हत्या होते आहे. आपल्याच धर्मातील गोष्टींबद्दल लिहिणाऱ्या लेखकाला आपण समजून घेऊ शकत नाही, तर दुसऱ्या धर्मातील लिखाण कधी समजून घेणार ? असा सवालही त्यांनी केला.
हायडेलबर्ग सारख्या विद्यापीठ ज्ञान केंद्रावर महायुध्दात बॉंब पडला नव्हता.
ज्ञानच संपले तर रचनात्मक काहीच शिल्लक राहणार नाही. समाज विकसित होणे म्हणजे त्या समाजातील ‘ सिव्हील सोसायटी ‘ विकसित होणे, हे आपण समजून घेत नाही, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.
उदय प्रकाश म्हणाले,’ फेसबुक सारख्या माध्यमांमुळे कविता पोचू लागले आहे. मासिकांनी कविता मागवणे बंद केले आहे. थेट संवाद होवू लागला आहे, एका कवीला दुसरे कवी वाचायला मिळू लागले आहेत. मी आता एका भाषेचा कवी राहिलो नाही, सर्वांचा कवी झालो आहे.
चांगल्या रचना असतील तर त्या सर्वांपर्यंत पोहोचतातच, असा सल्ला त्यांनी दिला. चांगला लेखक जुनी मिथके मोडून काढून, नवी मिथके जन्माला घालतो,कवी विद्रोह मांडतो, तेव्हाही तो एकटा नसतो. अनेक साद, प्रतिसाद  त्याच्या प्रवाहात मिळत राहतात,असे निरीक्षण देखील उदय प्रकाश यांनी सांगितले.

संयोजक मोनिका सिंग यांनी उदय प्रकाश यांचा सत्कार केला.
सभागृहात भारत सासणे, गणेश विसपुते, युवराज शहा असे अनेक मान्यवर उपस्थित होते. आर जे तरुण यांनी आभार मानले
या कार्यक्रमा नंतर ‘अनुवाद की दुनिया ‘विषयावर झालेल्या परिसंवादात दामोदर खडसे,सोनाली नवांगुळ, चंद्रकांत भोंजाळ,सेवक अय्यर सहभागी झाले.
SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

किडनी विक्री प्रकरणातील सावकरांवर कधी कारवाई करणार? – वडेट्टीवार

मुंबई- विदर्भातील शेतकऱ्यांना कर्ज फेडण्यासाठी किडनी विकवी लागल्याचा प्रकार...

DGCA कडून विमान कंपनीला वाचवण्याचा प्रयत्न:अजित पवार अपघात प्रकरणी रोहित पवारांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल

मुंबई-राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाचे आमदार रोहित पवार...

घरकुल लाभार्थ्यांना तीन पावसाळे उलटले तरी घर मिळाली नाही,जनाची नाही तर मनाची ठेवा – वडेट्टीवार

मुंबई- राज्यातील घरकुल योजनेतील घरं मंजूर होऊनही गेल्या तीन...

अमेरिकेत हिमवादळामुळे 11 हजार विमानांची उड्डाणे रद्द:5 लाख घरांची वीज गेली, 153 वर्षांत पहिल्यांदाच वर्तमानपत्र छापले जाऊ शकले नाही

वॉशिंग्टन डीसी-अमेरिकेत जोरदार वाऱ्यांमुळे आणि प्रचंड बर्फवृष्टीमुळे विमानतळावरील धावपट्ट्या...