सांस्कृतिक कार्यक्रमातून संविधान विषयक जागृती आणि सामाजिक संदेश
पुणे :प्रजासत्ताक दिनानिमित्त महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटीतर्फे आझम कॅम्पस मैदानावर शिवसेनेचे पुणे शहरप्रमुख संजय मोरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. अध्यक्षस्थानी महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ.पी. ए. इनामदार होते. यावेळी विद्यार्थांनी संचलनाद्वारे ध्वजाला सलामी दिली.
संविधान , विविधतेेतून एकता, महिला सक्षमीकरण, सेव्ह फार्मर, अॅसिड अटॅक विषयक जागृती, अशा अनेक विषयांवर सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले. स्कूल ऑफ आर्टच्या विद्यार्थ्यांनी साकारलेल्या प्रदर्शनाचे उद्घाटन संजय मोरे यांच्या हस्ते करण्यात आले.
संस्थेचे पदाधिकारी आबेदा इनामदार, लतीफ मगदूम, शिवसेनेचे कॅन्टोन्मेंट विभाग प्रमुख डॉ. अमोल देवळेकर इत्यादी मान्यवर उस्थितीत होते. प्राध्यापक वर्ग, शिक्षक वर्ग, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.