प्रभात स्वरांनी उजळली रौप्यमहोत्सवी पुण्यभूषण दिवाळी पहाट !
पुणे :
पणत्या, आकाश कंदील,वासुदेव, सनई चौघडा , रांगोळ्या यांच्या मंगल वातावरणात महेश काळेंच्या प्रभात स्वरांनी रौप्यमहोत्सवी ‘पुण्यभूषण दिवाळी पहाट ‘ उजळली !
त्रिद्ल, पुणे , रोटरी डिस्ट्रिक्ट 3131 , कॉसमॉस बँक आयोजित पहाट दिवाळीचा महेश काळे यांचा गान मैफलीचा कार्यक्रम बालगंधर्व रंगमंदीर येथे आयोजित केला होता.
पुण्याची पहिली ‘ पहाट दिवाळी ‘ असलेल्या उपक्रमाचा यंदा रौप्यमहोत्सव होता.
डॉ.सतीश देसाई यांच्या संकल्पनेतून गेली सुमारे 25 वर्ष पहाट दिवाळी रसिकांचे कान तृप्त करत आहे. या वर्षीच्या रौप्यमहोत्सवी मैफलीने या परंपरेचा कळसाध्याय गाठला.
महापौर मुक्ता टिळक, रोटरीचे डिष्ट्रीक्ट गव्हर्नर अभय गाडगीळ, कॉसमॉस बँकेचे मिलिंद काळे, कृष्णकुमार गोयल ,रश्मी कुलकर्णी, रमेश शहा,आदी मान्यवर उपस्थित होते.
पुण्यभूषण टीमने उत्तमपणे आयोजन केले होते. तुडुंब गर्दी आणि दर्दी असलेल्या या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मकरंद टिल्लू यांनी केले.
शताब्दी साजऱ्या करणाऱ्या ५ संस्थांना गौरविण्यात आले. त्यात शिक्षण प्रसारक मंडळी, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्ट , निवारा वृद्धाश्रम, आनंदाश्रम, लायन्स इंटरने१ानल, यांचा समावेश होता..
रोटरीच्या दिवाळी अंकाचे प्रकाशन यावेळी झाले
महेश काळे यांनी अनुरंजनी रागातील बंदिशी, भूपाल तोडी, तसेच ‘आधी रचिली पंढरी ‘ असे अभंग गाऊन पुणेकर रसिकांना तृप्त केले. शेवटी ‘ सूर निरागस हो ‘ मधील ‘ मोरया ‘ चा जयघोष करताना काळे यांच्यासमवेत सभागृहातील सर्व उपस्थितांनी त्यात आपले निरागस सूर मिसळले आणि ‘पुण्यभूषण दिवाळी पहाट ‘ ची मैफल संपली !