आत्मा कामात ओतल्याशिवाय समाजसेवा अशक्य : डॉ.के.एच. संचेती

Date:

नेत्रसेवा राष्ट्रीय पुरस्काराचे वितरण
पुणे :’ नेत्रसेवेच्या क्षेत्रात पुणे नेत्रसेवा प्रतिष्ठान झोकून देऊन काम करीत आहे. तन, मन आणि आत्मा कामात ओतल्याशिवाय अशी अखंड समाजसेवा   करता येणे शक्य नाही ‘, असे प्रतिपादन ज्येष्ठ वैद्यकीय तज्ज्ञ डॉ.के.एच. संचेती यांनी केले.
पुणे नेत्रसेवा प्रतिष्ठानचा यंदाचा ‘राष्ट्रीय नेत्रसेवा पुरस्कार ‘ अरविंद आय केअर सिस्टिम ‘ या संस्थेला अस्थितज्ज्ञ डॉ.के.एच. संचेती , तसेच ज्येष्ठ उद्योजक ‘ सकाळ पेपर्स लि. चे अध्यक्ष प्रतापराव पवार यांच्या हस्ते देण्यात आला.
मुक्तांगण हायस्कुल सभागृह, सहकारनगर येथे हा कार्यक्रम रविवारी सकाळी ११ वाजता झाला.
डॉ संचेती म्हणाले, ‘पुणे नेत्रसेवा प्रतिष्ठान ही संस्था समाजसेवेच्या प्रेरणेने   गेली 40 वर्ष अविरतपणे समाज कार्यात झोकून देऊन काम करत आहे .तन ,मन आणि आत्मा कामात ओतल्याशिवाय अशी अखंड समाजसेवा करता येणे शक्य नाही
डॉ .पी .नामपेरुमलयस्वामी हे गरिबांची सेवा करायच्या हेतूने आपले 50 टक्के काम, सर्जरी , उपचार इ मोफत करतात, असे अशक्य कोटीतील काम जगातील कोणताही डॉक्टर करत नसावा,तेंव्हा त्यांची या पुरस्कारासाठी योग्य निवड पुणे नेत्रसेवा  प्रतिष्ठान ‘ यांनी केली असेही डॉ संचेती म्हणाले.
प्रतापराव पवार म्हणाले,’गरिबांवर मोफत उपचार करूनही उर्वरित लोकांच्या सेवेतून स्वतःच्या जगण्यासाठी आवश्यक पैसे कमवता येतात,हे  डॉ नामपेरुमलयस्वामी यांनी दाखवून दिले. त्यामुळे ते समाजसेवा करू. इच्छीणार्यांसाठी प्रेरणा आहेत.
डॉ. नामपेरुमलयस्वामी म्हणाले, ‘वाजवी पैसे घेऊनही दर्जेदार उपचार, रुग्णसेवा देता येते.आधुनिक तंत्रज्ञान वापरत असल्यानेच आम्ही अधिक रुग्णांपर्यंत पोचू शकतो.शहरी भागापेक्षा खेड्यात अधिक काम करण्याची गरज ओळखून आम्ही तेथे जनजागृती व वर्षभर नेत्रसेवा शिबीरे राबवत असतो.गरीब रुग्ण असो कि श्रीमंत आम्ही गुणवत्तेत अजिबात तडजोड करत नाही .
अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून उपचार करतो ,असे डॉ. नामपेरुमलयस्वामी यांनी सांगीतले.
आरती काबरा यांनी  सूत्रसंचालन केले.प्रास्ताविक डॉ.सतिश देसाई यांनी केले.स्वागत आणि सत्कारमूर्ती परिचय डॉ.मधुसुदन  झंवर यांनी करून दिला.यावेळी डॉ. राजेश पवार, डॉ. पारस शहा, विनय शेट्टी, उल्हास पवार आदि मान्यवर उपस्थित होते.
डॉ सुवर्णा गोलेचा यांनी आभार  मानले.
SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

ईडीने अनिल अंबानींचे 3716 कोटी रुपयांचे 17 मजली घर केले जप्त : 40 हजार कोटींच्या फसवणूक प्रकरणात चौकशी सुरू

मुंबई-अंमलबजावणी संचालनालयाने (ED) रिलायन्स ग्रुपचे चेअरमन अनिल अंबानी यांचा...

अबब गुटखा विक्री प्रकरणी ५ वर्षांत १८ हजार आरोपी गजाआड ! २३९ कोटी १० लाखांचा मुद्देमाल जप्त- मुख्यमंत्र्यांनी दिली माहिती

आमदार जगताप यांच्या विधानसभेतील तारांकित प्रश्नानंतर धक्कादायक माहिती उघडमुंबई...

बांधकाम साईट्सवर प्रदूषण सेन्सर बंधनकारक:’क्लिन एअर पोर्टल’ डॅशबोर्डचे लोकार्पण, पातळीवर लक्ष ठेवणार-महापौर मंजुषा नागपुरे

पुणे -शहरात बांधकामांच्या ठिकाणी होणारे वायूप्रदूषण रोखण्यासाठी महत्त्वाचे पाऊल...

स्त्री जन्माचा दर कमी होतोय .. याची गंभीर दखल घेणार कधी ?आमदार जितेंद्र आव्हाड

स्त्री भ्रूण हत्या, गर्भलिंग चाचणी करणरे डॉक्टर,...