पुणे:महाराष्ट्र कॉस्मोपोलिटन एज्युकेशन सोसायटी च्या ‘पै कॉलेज ऑफ व्हिज्युअल इफेक्ट्स ,डिझाईन अँड आर्ट्स ‘आयोजित ‘पै आयटी ऑलिपिंयाड’ चा १९ डिसेंबर रोजी पारितोषिक वितरण सोहळा आयोजित करण्यात आला असून ४ विजेते विमाननगर वरून हेलीकॉप्टरने सोहळ्यास आझम कॅम्पसला येणार आहेत. प्राचार्य डॉ. ऋषी आचार्य यांनी ही माहिती पत्रकाद्वारे दिली. वितरण सोहळा १९ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता आझम कॅम्पसच्या असेम्ब्ली हॉल मध्ये होणार आहे. राहुल बक्षी (फोबस क्रिएशन्स मिडिया प्रा. लि. ) हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असून महाराष्ट्र कॉस्मोपोलिटन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ पी ए इनामदार हे अध्यक्षस्थानी असणार आहेत.
७ प्रदेशातील २७० शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांतील १५ हजार विद्यार्थ्यांनी या आयटी ऑलिपिंयाडमध्ये भाग घेतला असून या स्पर्धेचे हे नववे वर्ष आहे. ४ विजेत्या विधार्थ्याना हेलीकॉप्टरने आझम कॅम्पसला पारितोषिक सोहळ्यास येण्याचा बहुमान मिळणार आहे. विजेत्यांना लॅपटॉप,आय पॅड,टॅब आणि प्रमाणपत्रे देण्यात येणार आहेत.
अमित गाला,हर्षद सांगळे,इरफान शेख,मुमताज सय्यद हे मान्यवरही या समारंभास उपस्थित राहणार आहेत.
————————–