पुणे :मुंबईतील राज्यस्तरीय धर्म विषयक वक्तृत्व स्पर्धेत आझम कॅम्पसच्या स्पर्धकांनी यश मिळवले. ‘अंजुमन -ई -इस्लाम’संस्थेने आयोजित केलेली ही स्पर्धा करिमी लायब्ररी (मुंबई) येथे ६ ते ८ डिसेंबर रोजी झाली. मुफ्ती महमद हुसेन कासमी यांनी शिक्षक गटात प्रथम क्रमांक पटकाविला. आठवी ते दहावी गटात निबंध स्पर्धेत मसिरा सईद अन्सारी या विद्यार्थिनीने दुसरा क्रमांक पटकाविला. आझम कॅम्पस मधील इंग्लिश मिडीयम स्कुलने शिक्षक गटात प्रश्न मंजुषा स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविला.
राज्यस्तरीय धर्म विषयक वक्तृत्व स्पर्धेत आझम कॅम्पस चे यश
Date:

