ग्रामीण विद्यार्थ्यांना १ कोटी ७५ लाख किमतीच्या स्लीपिंग किट आणि जीवनोपयोगी साहित्याचे वितरण

Date:

पुणे :’ स्कॉ ‘ (Sleeping Children Around World )कॅनडा संस्था , ‘रोटरी क्लब ऑफ पुणे कॅन्टोन्मेंट  ‘ आणि १६ रोटरी क्लब च्या सहभागातून  ८  हजार ग्रामीण विद्यार्थ्यांना एकूण १ कोटी ७५ लाख किमतीच्या जीवनोपयोगी आणि शिक्षणोपयोगी साहित्याचे वितरण करण्यात येत  आहे . या जीवनोपयोगी साहित्याच्या संचात कपडे ,शैक्षणिक साहित्य ,झोपण्याचे साहित्य (स्लीपिंग किट ),दैनंदिन उपयोगाच्या वस्तूंचा समावेश आहे .

‘चिल्ड्रन ब्लीस  २०१९’ असे या आंतरराष्ट्रीय प्रकल्पाचे नाव आहे . १९९४ पासून या अभिनव उपक्रमात    ‘रोटरी क्लब ऑफ पुणे कॅन्टोन्मेंट  ‘सहभागी असून या उपक्रमाचे २०१८  हे रौप्यमहोत्सवी वर्ष होते  . या प्रकल्पात १६ रोटरी क्लब सहभागी असून त्यात रोटरी क्लब ऑफ पुणे गांधीभवन चा समवेश आहे.

१७ ते ३० नोव्हेंबर या कालावधीत ‘चिल्ड्रन ब्लीस  २०१९’  या प्रकल्पांतर्गत स्लीपिंग किट आणि जीवनोपयोगी साहित्याचे वितरण केले  जात आहे .पुणे ,नगर ,सांगली ,सोलापूर जिल्ह्यातील गावांमध्ये कॅनडा आणि रोटरीचे सदस्य जात आहेत . सांगली आणि भोर परिसरातील कार्य्रक्रमानंतर २३ नोव्हेंबर रोजी डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता सुपे  (ता. बारामती  ) येथे  सोहळ्याचे आयोजन आले असल्याची माहिती ,रोटरी क्लब ऑफ पुणे कॅन्टोन्मेंटचे अध्यक्ष सरफराज  पोटिया  ,’स्कॉ ‘ कॅनडा संस्थेचे आर्ची डीकॉस्त,के माउंटफोर्ड यांनी पत्रकार परिषदेत दिली . यावेळी प्रकल्पप्रमुख समीर रूपांनी ,पंकज आपटे ,रोटरी क्लब ऑफ पुणे गांधी भवन चे माजी अध्यक्ष आणि प्रकल्पाचे समन्वयक शैलेश गांधी हेही पत्रकार परिषदेला उपस्थित होते . ‘समाधानकारक झोप ही सुखकर आयुष्यासाठी महत्वाची असते .शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी महत्वाची असते ‘ हे तत्व डोळ्यासमोर ठेवून या प्रकल्पाची आखणी करण्यात आली आहे . त्यानुसार ग्रामीण भागातील शालेय विद्यार्थ्यांना स्लीपिंग किट चे वितरण करण्यात येते . या किट मध्ये ब्लॅंकेट ,सतरंजी ,चादर ,उशी ,बेडशीट ,मच्छरदाणी ,योगसाठी मॅट ,मच्छरदाणी ,स्वेटर ,टॉवेल ,कानटोपी,नाईट ड्रेस  अशा गोष्टींचा समावेश असतो . शिवाय स्कुल बॅग ,वह्या ,पेन्सिल ,पट्टी असे  उपयुक्त शैक्षणिक साहित्यही विद्यार्थ्यांना देण्यात येते .

या प्रकल्पांतर्गत १७ ते ३० नोव्हेंबर या कालावधीत  सांगली ,पुणे जिल्ह्यातील ग्रामीण विद्यार्थ्यांना जीवनोपयोगी साहित्य देण्यात येत आहे  . सुपे येथे पुढील कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे . ,रोटरी क्लब ऑफ पुणे कॅन्टोन्मेंट ,’स्कॉ ‘ कॅनडा ही संस्था यांच्या संयुक्तपणे या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे . ,’स्कॉ ‘ कॅनडा संस्थेचे टीम लीडर डायने बेरीक ,रोटरीचे पदाधिकारी शैलेश गांधी ,पंकज आपटे ,समीर रुपाणी हे या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत . १९७० साली या सामाजिक उपक्रमाला सुरुवात झाली . कॅनडातील सामाजिक संस्था या उपक्रमाला मदत करत आले आहेत .३३ देशात हा उपक्रम चालू असून आतापर्यंत दीड कोटी गरजू विद्यार्थ्यांना स्लीपिंग किट वितरित करण्यात आले आहेत .

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

जर्मनीतील शिक्षणा करीता मार्गदर्शन

पुणे, १३ मार्च २५ - सिंबायोसिस स्कील्स ॲन्ड प्रोफेशनल...

एलईडी चित्ररथाच्या माध्यमातून समाज कल्याण विभागाच्या योजनांचा जागर

पुणे दि. १३: समाज कल्याण विभागाच्या विविध योजनांची माहिती...

बंदिशींद्वारे भारतीय स्त्री शक्तीचा सन्मान

भक्तिसुधा फाऊंडेशनच्या वतीने उर्जा' : सन्मान भारतीय स्त्री आदर्शांचा...