खडकवासला धरणाच्या मुख्य कालव्याच्या कामाचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याची मागणी
महाराष्ट्र जोशी समाज संघटनेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
पुणे :खडकवासला धरणाच्या मुख्य कालव्याचे,दगडी गेटचे काम निकृष्ट दर्जाचे झाले असून या कामाचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याची मागणी महाराष्ट्र जोशी समाज संघटनेने आज १८ नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन केली.या बाबतच्या तक्रारींचे निवेदन आज संघटनेच्या महिला आघाडीच्या पुणे शहराध्यक्ष सौ.शुभांगी(सीमा)महेश हेंद्रे यांनी जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांना दिले.
धरणापासून ५०० मीटर अंतरावर बसवलेल्या गेटच्या दगडी बांधकामाची पडझड झाल्याची,गळती सुरु असल्याची बाब जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आली. हे गेट केंद्रीय जलविद्युत संशोधन केंद्रास पाणी वळवून देण्यासाठी बसवले आहे. तेथे उपकालवा काढण्यात आला आहे. अनेक वर्षे या उपकालव्याची दुरुस्ती झालेली नाही आणि सर्व काम निकृष्ट दर्जाचे आहे. पाटबंधारे विभागाचे याकडे दुर्लक्ष होत आहे.
खडकवासला धरणातून मुख्य दरवाजात बसविण्यात आलेल्या दगडी गेटचे काम निकृष्ट दर्जाचे झाले असल्यामुळे तो कालवा फुटून पूरपरिस्थिती निर्माण होण्याची शक्यता निर्माण होऊ शकते म्हणून स्ट्रक्चरल ऑडीट करून ठेकेदारांवर कारवाई करावी अशी मागणी जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे.
संबंधित कालव्याचे निकृष्ट दर्जाचे झालेले कामाची चौकशी समिती नियुक्त करून त्यांचा अहवाल मागवावा , आय.आय.टी कानपूर यांच्याकडून संबंधित कामाचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात यावे.१५ दिवसात कारवाई जर झाली नाही तर जिल्हाधिकारी कार्यालय येथे आंदोलन करू असा इशारा महाराष्ट्र जोशी समाज संघटना राज्य उपाध्यक्ष निलेश प्रकाश निकम यांनी संघटनेतर्फे दिला.
कैलास हेंद्रे,(अध्यक्ष महाराष्ट्र राज्य) निलेश प्रकाश निकम (उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य) संदीप निकम (उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख) गणेश जोशी (पिंपरी-चिंचवड,शहराध्यक्ष), शेरु भाऊ परदेशी,(शहराध्यक्ष पुणे) ,संजय गुलाब जोशी (पश्चिम महाराष्ट्र संपर्कप्रमुख), सनी साळुंके (उपाध्यक्ष पुणे शहर),सुजित हांडे (उपाध्यक्ष पिंपरी-चिंचवड),तानाजी सुर्वे, रामदास निकम, महेश हेंद्रे,संदेश जोशी,साहिल साळुंके,साहिल सतीश कंट्रोल उपस्थित होते.