पुणे:पर्वती विधानसभेचा आम आदमी पक्षा चे(आप)अधिकृत उमेदवार म्हणून पक्षाचे युवा कार्यकर्ते संदीप सोनवणे यांनी आजपासून (बुधवारी) सायंकाळी प्रचाराची सुरुवात केली.
नुकतीच आम आदमी पक्षाने अधिकृतरीत्या त्यांची उमेदवारी जाहीर केली. पर्वती मतदार संघात उमेदवारी जाहीर झालेले ते पहिले उमेदवार ठरले आहेत.
“पर्वतीची यंदाची निवडणूक नसून जनआंदोलन असेल आणि प्रस्थापित विरुद्ध आम आदमी अशी लढाई असेल”, असे त्यांनी सांगितले.
आज २५ सप्टेंबर रोजी प्रचार शुभारंभ प्रसंगी शहरातील पक्षाचे पदाधिकारी, शहराध्यक्ष मुकुंद किर्दत उपस्थित होते.
स्वामी विवेकानंद पुतळा, सातारा रस्ता ,बिबवेवाडी, पुणे येथे सायं 5 वाजता प्रचार शुभारंभ झाला . पुतळ्याला हार अर्पण करून प्रचार प्रारंभ करण्यात आला.सर्वांनी मोठ्या संख्येत प्रचारात उतरून परिवर्तनाचा भाग बना, असे आवाहन पक्षातर्फे करण्यात आले आहे.
अजिंक्य शिंदे (महाराष्ट्र अध्यक्ष, आप युवक आघाडी), आशुतोष शिपळकर,योगेश इंगळे, पैगंबर शेख, शाम सोनवणे, सुभाष कारंडे, मनोज थोरात, जिब्रील शेख उपस्थित होते