राष्ट्रवादी काँग्रेस डॉक्टर्स सेल चे निवेदन
पुणे:आधार हॉस्पिटल मध्ये हृदयविकाराने झालेला रुग्णाचा मृत्यू संदर्भात जाणूनबूजून केलेल्या खोट्या तक्रार प्रकरणी डाॅ. दिपक शिंदे यांच्या पाठीशी पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस डॉक्टर्स सेल ऊभी आहे आणि सर्वतोपरि मदत करत आहे, असे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस डॉक्टर्स सेल चे अध्यक्ष डॉ सुनील जगताप यांनी प्रसिद्धीस दिले आहे.
या संदर्भात २१ सप्टेंबर रोजी सेल ची बैठक घेण्यात आली. डाॅ. शिंदे यांनी प्रकरणाची माहिती दिली. निवृत्त पोलिस अधिकारी आपले वजन वापरून जाणीवपूर्वक त्रास देत असल्याचे , ससून च्या तज्ज्ञ समितीने याप्रकरणी उपचारात हेळसांड झाली नसल्याचा अहवाल दिल्याचेही त्यांनी या बैठकीत सांगितले.
सेलचे विधानसभा अध्यक्ष व कमिटीचे पदाधिकारी उपस्थित होते.
कात्रज येथे डाॅ सुनिल जगताप यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. या प्रकरणी सर्व वैद्यकीय संघटना डॉ दीपक शिंदे यांच्या पाठीशी असून त्यांच्या उपोषणाला पाठिंबा असल्याचे डॉ सुनील जगताप यांनी सांगितले