डॉ. रमेश मूर्ती यांना ‘डॉ व्ही. के. चिटणीस’ पारितोषिक
पुणे :
‘महाराष्ट्र ऑफ्थॅल्मॉलॉजिकल सोसायटी’चा ‘डॉ व्ही. के. चिटणीस पुरस्कार’ पुण्यातील नेत्रतज्ञ् डॉ. रमेश मूर्ती यांना जाहीर झाला आहे. नवीन उपचार पद्धती, आधुनिक शस्त्रक्रिया आणि नवीन तंत्रज्ञान वापरून नेत्रसेवेत उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल हा पुरस्कार आहे.
‘महाराष्ट्र ऑफ्थॅल्मॉलॉजिकल सोसायटी’च्या पुण्यातील वार्षिक परिषदेत शुक्रवारी, १३ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजता हॉटेल जे. एम. मेरिट, पुणे येथे हा पुरस्कार दिला जाणार आहे.
‘महाराष्ट्र ऑफ्थॅल्मॉलॉजिकल सोसायटी’चे अध्यक्ष डॉ. प्रकाश मराठे, सचिव धर्मेंद्र पाटील, आणि सोसायटीच्या ‘सायंटिफिक समिती’चे अध्यक्ष डॉ. परीक्षित गोगटे यांनी ही माहिती दिली.