चायनीज एज्युकेशन मिनिस्ट्री ‘च्या चिनी निबंध वाचन स्पर्धेत तन्मय साळवेकर तिसरा
‘पुणे :
‘चायनीज एज्युकेशन मिनिस्ट्री ‘च्या वतीने घेण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय निबंध वाचन स्पर्धेत मिलेनियम नॅशनल स्कुल च्या तन्मय साळवेकर ला तिसरे पारितोषिक मिळाले . ‘माझी चिनी भाषा शिक्षिका ‘ या विषयावरील निबंधाचे वाचन तन्मय साळवेकरने केले होते. तन्मयचा सत्कार मिलेनियम स्कुल चे संचालक अन्वित फाटक यांच्याहस्ते करण्यात आला . या वेळी ‘येह चायना ‘ संस्थेच्या संचालक उषा साहू ,’यिन -यांग ‘ सेंटर फॉर चायनीज लँग्वेज च्या संचालक यशोधरा गाडगीळ उपस्थित होत्या .
मिलेनियम नॅशनल स्कुल मध्ये २ वर्षांपासून चिनी भाषेचे वर्ग घेतले जातात . या उपक्रमात ६० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग असून त्यांना विविध परीक्षांत यश मिळाले आहे . या यशस्वी विद्यार्थ्यांचा गौरव देखील यावेळी करण्यात आला .
——–