पुणे:जलसाक्षरता केंद्र(यशदा, पुणे) प्रकाशित ‘भू वारसा ‘ पुस्तकाचे प्रकाशन अर्थ,वन आणि नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार,जलतज्ञ राजेंद्रसिंह,’पानी फौंडेशन’ चे अमीर खान यांच्या हस्ते झाले.
जलशक्ती -जनशक्ती संमेलन व संवाद या कार्यशाळेत कार्यक्रमात प्रियदर्शिनी सभागृह (चंद्रपूर) येथे दिनांक ४ ऑगस्ट २०१९ रोजी हे पुस्तक प्रकाशित झाले.जलसाक्षरता केंद्र(यशदा, पुणे) चे डॉ सुमंत पांडे आणि सहकारी उपस्थित होते .
जलसाक्षरतेच्या चळवळीत सहभागी होणा-या फळीच्या क्षमता बांधणीसाठी , ज्ञानवृद्धीसाठी यशदाच्या जलसाक्षरता केंद्राच्या वतीने वाचन साहित्य तयार करण्यात येत आहे.
संतवाणीतील जलसाक्षरता’,‘परंपरेतील जलवन माहात्म्य’ ही दोन पुस्तकानंतर ‘भू-वारसा’ हे तिसरे पुस्तक प्रकाशित करण्यात आले आहे.परंपरा आणि शास्त्र यामधील भूविज्ञान आणी जलविज्ञानाबाबत माहितीचे संकलन या पुस्तकात करण्यात आले आहे.
जलशास्त्राबाबत विविध उल्लेख व त्यावियी असलेल्या आदराचा वेध या पुस्तकात घेण्यात आला आहे. छत्रपती शिवाजी महाराज, अहिल्याबाई होळकर, छत्रपती शाहू महाराज यानी केलेली लोकोपयोगी कामे ,महात्मा ज्योतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज याांचे प्रबोधन या पुस्तकात समाविष्ट करण्यात आले आहे.
आधूनिक तंत्रज्ञान, अचूक नकाशे व माहिती यांचा जलविषयक कामातील वापर या बाबींचा ऊहापोह या पुस्तकात करण्यात आला आहे.