मंचर : भीमा नदीच्या उगमापासून भीमाशंकर ते विजापूर अशी ‘नमामि चंद्रभागा- जल साक्षरता यात्रेस प्रारंभ झाला. दिनांक ७ ते १४ ऑगस्ट २०१७ या कालावधीत काढण्यात आलेल्या यात्रेदरम्यान
आज मंचर येथे अण्णासाहेब आवटे (मंचर) महाविद्यालयात जल जागृती करणारी पथनाट्य सादर करण्यात आली. या पथनाट्यास चांगला प्रतिसाद मिळाला.
यावेळी ‘पुणे रोटरी वॉटर कमिटी’ प्रमुख व जलप्रेमी सतीश खाडे, शैलजा देशपांडे (जीवित नदी संस्था)
यांची व्याख्याने झाली. प्राचार्य पांडुरंग गायकवाड अध्यक्षस्थानी होते.
‘ जनतेबरोबर प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांची जलसाक्षरता देखील महत्वाची आहे. नळांना वॉशर बसवणे, शौचालय बांधकामात सेफ्टी टँक वापरणे, बोअरवेल रिचार्ज करणे हे उपाय ही महत्यपूर्ण ठरतात’, असे सतीश खाडे म्हणाले.
शैलजा देशपांडे म्हणाल्या नदीला समजून घेतले पाहिजे.परिसंस्था जगवून नदी जीवंत ठेवली पाहिजे.
जलबिरादरीचे राज्य संघटक सुनील जोशी, ‘ जलजागृती यात्रा ‘ समन्वयक नरेंद्र चुघ, मकरंद शेंडे,
हर्षल मौर्डे, संजय यादवराव, येवले महाराज,
संदीप चोडणकर उपस्थित होते. यात्रा मार्गावर जलसंरक्षण समित्या स्थापन करण्यात येत आहे.
घोडेगाव येथे राजेंद सिंह यांच्या उपस्थितीत जलसंरक्षण समिती सदस्यांना जल, वन, नदी, पर्यावरण रक्षणाची शपथ देण्यात आली.
भीमा नदी संरक्षणासाठी महाविद्यालयांमध्ये ‘ भीमा कार्य दल ‘ स्थापन करण्यात येत आहे.आवटे महाविद्यालयात या दलाची स्थापना जलबिरादरी ‘ च्या वतीने करण्यात आली
नमामि चंद्रभागा जल साक्षरता यात्रे विषयी
‘नमामि चंद्रभागा’या उपक्रमासाठी अर्थ व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी डॉ.राजेंद्रसिंह यांच्या समवेत विशेष मेहनत घेतली आहे. आपल्या संदेशात वनमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, भीमा खोर्यातील शालेय तसेच महाविद्यालयीन विद्यार्थी आणि पर्यावरणीय क्षेत्रात काम करणारे कार्य करणार्या कार्यकर्त्यांना युवापिढीच्या चळवळीत जोडण्याचा माझा मानस आहे. वनविभाग त्यासाठी प्रयत्नशील राहील.
वनविभागांने एका अभ्यास रथाचे नियोजन केले असून, याच दरम्यान गावकरी आणि युवा संवाद केला जाणार आहे. मुंबई येथून प्रा.स्नेहल दोंदे यांच्या नेतृत्वाखाली 15 विद्यार्थिनी या यात्रेत सहभागी होत आहेत.
‘हवामान बदल’(क्लायमेटचेंज) हा भारत देशासमोरचा सध्या सर्वात कळीचा मुद्दा आहे. ती राष्ट्रीय आपत्ती मानली पाहिजे. त्यामुळे निर्माण झालेल्या ‘दुष्काळ आणि पूर’ या दोन घटनांचा सर्व देशावर कमालीचा ताण आहे. नदी आणि तिची परिसंस्था यावर तर अधिक आहे. ‘पूर आणि दुष्काळ’ मुक्त आणि समृध्द भारत व्हायचा असेल तर सामान्य माणसांना, विशेषतः पुढच्या पिढीला नदीशी जोडण्याच्या अनुषंगाने ‘जलबिरादरी’ने देशभरात 101 ठिकाणी ‘नदी संवाद जल साक्षरता’ यात्रांचे आयोजन या वर्षात केले आहे. काश्मीर ते कन्याकुमारी या कार्यक्षेत्रात या जलयात्रा आयोजित केल्या होत्या.
विजापूर येथे देशभरातून निघालेल्या 101 यात्रांचे समायोजन होणार असून, तेथेच 16 ते 18 ऑगस्ट 2017 या कालावधीत डॉ. राजेंद्रसिंह यांच्या मार्गदर्शनाखाली ‘राष्ट्रीय जलसंमेलन’ आयोजित करण्यात आले आहे.
पुढच्या पिढीची आणि सामान्य माणसांची नदी प्रति आपली जबाबदारी निश्चित व्हावी सातत्याने होत असलेल्या नदीच्या अतिक्रमण, शोषण आणि प्रदूषण यातून तिला मुक्त केले जावे, या दृष्टीने हे ‘जल-जनजागरण’ आहे.
या उपक्रमास ’पुणे विद्यापीठ’, ’सोलापूर विद्यापीठ’, ’महाराष्ट्र विकास केंद्र’, ’जीवितनदी’, ’पुणे जिल्हा सहकारी गृहनिर्माण महासंघ’, ’विश्वसंस्कृती आश्रम’, ’सागरमित्र अभियान’, ’गायत्री परिवार’, ’वसुंधरा स्वच्छता अभियान’, ’बावधन एरिया सभा-राम नदी स्वच्छता अभियान’, ’वृक्षम’, ’ज्ञानशक्ती विकास वाहिनी’, ’दि गुजराती मित्र मंडळ’, सोलापूर यांचे सहकार्य लाभले आहे.
जलबिरादरीचे राज्य संघटक सुनील जोशी, ‘जलबिरादरी’चे पुणे शहर व जिल्हाध्यक्ष विनोद बोधनकर, यात्रा समन्वयक नरेंद्र चुघ, ‘महाराष्ट्र विकास केंद्र’चे अध्यक्ष अनिल पाटील, ‘पुणे जिल्हा सहकारी गृहनिर्माण महासंघा’चे अध्यक्ष सुहास पटवर्धन, पावन पवना आणि ‘पानी फौंडेशन’चे समन्वयक धनंजय शेडबाळे, जीवित नदीच्या शैलजा देशपांडे, मकरंद शेंडे, प्रभाकर बांदेकर (जलबिरादरी) आणि संबंधित संस्थांचे प्रतिनिधी यात्रेच्या समन्वयक समितीत सहभागी आहेत.
(दिनांक-यात्रा मार्ग आणि कार्यक्रम या क्रमाने)
7 ऑगस्ट -शुभारंभ-भीमाशंकर भीमा नदी उगम स्थळ-लोकसंकल्प
8 ऑगस्ट -मंचर-राजगुरुनगर-लोकसंवाद
9 ऑगस्ट -देहू-आळंदी-नदीकाठच्या लोकांशी संवाद आणि संत-वारकरी संप्रदाय प्रतिनिधीशी चर्चा.
10 ऑगस्ट -पुणे -सकाळी 7. 30 -नदी संवाद-जीवित नदी आयोजित नदी भेट.
पुणे विद्यापीठ- 10 ते दुपारी 1 विद्यार्थी संवाद.
पिंपरी-चिंचवड महानगरपालिका-नगरसेवक, उद्योजक, नागरिकांशी संवाद-दुपारी 3 ते 5
11 ऑगस्ट -यवत,केडगाव,पाटस व दौंड- नागरिकांशी संवाद.
12 ऑगस्ट -कुरकुंभ, भिगवण, पळसदेव, रांजणी, अकोले आणि नीरा नरसिंहपूर
13 ऑगस्ट -पंढरपूर-वारकरी संप्रदायातीलमान्यवर आणि विद्यार्थी संवाद.
14 ऑगस्ट सोलापूर-सोलापूर विद्यापीठ येथे विद्यार्थ्यांशी संवाद-सकाळी 10 ते 1 आणि दुपारी- 3 ते 5 जिल्हाधिकारी कार्यालय सभागृह-‘नमामि चंद्रभागा’ उपक‘माच्या कृतीनियोजनाबाबत मंथन-लोकसंवाद.

