पुणे :
भारती अभिमत विद्यापीठ इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड आंत्रप्रुनरशिप डेव्हलपमेंट (‘आयएमईडी’) आणि पोलंडमधील ‘युनिव्हर्सिटी ऑफ बिझनेस इन रॉकलॉव् ‘ या विद्यापीठात शैक्षणिक आदान -प्रदान होणार असल्याची माहिती ‘युनिव्हर्सिटी ऑफ बिझनेस इन रॉकलॉव् ‘च्या प्रतिनिधी डॉ अनेटा सिझिमनसॉफ आणि भारती अभिमत विद्यापीठ व्यवस्थापनशास्त्र विभागाचे अधिष्ठाता आणि ‘आय एम ई डी’चे संचालक डॉ सचिन वेर्णेकर यांनी दिली .
यासंबंधी २७ जुलै रोजी ‘आय एम ई डी’,पौड रस्ता कॅम्पस मध्ये बैठक झाली . डॉ सचिन वेर्णेकर म्हणाले, ‘ विद्यार्थ्यांना जागतिक व असामान्य अनुभव आंतरराष्ट्रीय स्तरावर मिळावा या ध्यासाने दोन्ही संस्था तंत्रज्ञानाच्या साहाय्याने काम करतील.संस्थाना ज्ञान अदान-प्रदान करता येणार आहे’.डॉ.एनेटा म्हणाल्या, ‘ स्पर्धेच्या युगात आंतरराष्ट्रीय शैक्षणिक अनुभवाला अधिक महत्त्व आहे. तो विद्यार्थ्यांना देण्याचा प्रयत्न दोन्ही संस्था करतील’.
आंतरराष्ट्रीय व्यवस्थापनशास्त्र सल्लागार प्रा. जयंत ओक ,’आयएमईडी’च्या प्लेसमेंट विभागाचे प्रा.दीपक नवलगुंद हे उपस्थित होते.