पुणे :महाराष्ट्र कॉस्मोपोलिटन एज्युकेशन सोसायटी मध्ये स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी ‘पी ए इनामदार आयएएस कॉम्पिटिटिव्ह एक्झाम सेंटर ‘ सुरु करण्यात आले असून सोसायटीचे अध्यक्ष डॉ पी ए इनामदार यांच्या हस्ते झाले.
आयकर विभागाचे उपायुक्त डॉ . उज्वलकुमार चव्हाण ,केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतील यशस्वी व्यक्तिमत्व असलेले मच्छिन्द्र गळवे हे प्रमुख पाहुणे म्ह्णून उपस्थित होते
.या सेंटरचे कार्यकारी संचालक प्रशांत चव्हाण यांनी प्रास्ताविक केले.विधी महाविद्यालयाचे प्राचार्य रशीद शेख यांनी पाहुण्यांचे स्वागत केले.
हा कार्यक्रम आझम कॅम्पस (पुणे कॅम्प ) च्या असेम्ब्ली हॉल मध्ये झाला. केंद्रीय लोकसेवा आयोग ,महाराष्ट्र लोकसेवा आयोग ,बँक ,आरआरबी , स्टेट सर्विस बोर्ड,महा ऑनलाईन अशा परीक्षांना बसणाऱ्या विद्यार्थ्यांना येथे तज्ज्ञांचे मार्गदर्शन उपलब्ध करून दिले आहे .
विद्यार्थ्यांना वर्षभर मोफत वाचनालय व अभ्यासिका उपलब्ध करून देण्यात आली आहे.
पुण्याच्या मध्यभागी असलेल्या पुणे कॅम्प भागात २४ एकर जागेत महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीमध्ये केजी टू पीजी शिक्षणाची सुविधा उपलब्ध असून ३२ आस्थापनांमध्ये ३० हजार विद्यार्थी शिकतात . सर्व विद्या शाखा ,डीएड ,बीएड ,विधी ,दंत चिकित्सा ,युनानी ,फिजिओथेरपी ,व्यवस्थापन ,माहिती तंत्रज्ञान ,संगणक दुरुस्ती ,चित्रकला अशा सर्व प्रकारचे कोर्सेस उपलब्ध आहेत .भव्य क्रिकेट मैदानासह स्पोर्ट्स अकेडमी आहे . स्पर्धा परीक्षा केंद्र हे या शैक्षणिक सुविधांमध्ये महत्वाचे पाऊल आहे .
‘ स्पर्धा परीक्षा यशस्वी होण्यासाठी आपण इंग्रजी माध्यमातून, शहरात शिकलो पाहिजे असे नाही. यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये जिल्हा परिषद शाळातील विद्यार्थ्यांचे प्रमाण ९० टक्के आहे. स्पर्धा परीक्षा वाटतात तितका अवघड नाहीत,अभ्यासासोबत इतर उपक्रमात,स्पर्धात सहभागी व्हा आणि व्यक्तिमत्व विकसित करा . आपल्याला समजलेला अभ्यास सहकाऱ्यांना समजावून सांगीतल्याने अधिक फायदा होतो.’, असा सल्ला मच्छिंद्र गळवे यांनी यावेळी बोलताना दिला.
स्पर्धा परीक्षा देताना आत्मविश्वास , कष्ट करण्याची सवय, प्रामाणिकपणा, आणि संयम या गुणांची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन श्री. गळवे यांनी केले.
‘ स्पर्धा परीक्षा पध्दती ही देशाचा गाडा चालविण्यासाठी सक्षम युवक -युवती शोधणारी सर्वोत्तम पध्दती असून यशापयशापेक्षा व्यक्तीमत्व विकसनाची सुवर्णसंधी आहे. ‘ असे डॉ. उज्ज्वलकुमार चव्हाण यांनी यावेळी बोलताना सांगीतले.
अध्यक्ष स्थानावरुन बोलताना डॉ.पी. ए. इनामदार म्हणाले, ‘ १०० विद्यार्थ्यांना दीड वर्षाचे निवासी सुविधांसह ना नफा -ना तोटा तत्वावर प्रशिक्षण दिले जाईल. गरीब विद्यार्थ्यांना मोफत प्रशिक्षण दिले जाईल.
गरीबी आणि मागासलेपण हा गुन्हा नाही, तर त्याविरुद्ध संघर्ष न करणे हा गुन्हा आहे.स्वतःच्या क्षमता न वापरणे, हा गुन्हा आहे. म्हणून विद्यार्थ्यांनी वेळेचा सदुपयोग करावा. ‘