भक्तीमय वातावरणात रंगला ‘तुका म्हणे’ आणि ‘वैकुंठ नायका ‘ रंगनृत्य आविष्कार

Date:

पुणे :’ कैसा गाऊ गीती, कैसा ध्याऊं चित्ती । कैसी स्थिती मती ,दावी मज ।। तुका म्हणे जैसे ,दास केले देवा ‘ असे संत तुकारामांचे भावविभोर शब्द रंग नृत्यांतून समोर  आले अन्’आता आवडीचा पुरवावा सोहळा ‘ अशी रसिकांची भक्तीमय अवस्था झाली.
निमित्त होते ‘कलावर्धिनी चॅरिटेबल ट्रस्ट’ आयोजित संत तुकारामांच्या अभंगांवर आधारित ‘तुका म्हणे’ हा  रंगनृत्य आविष्कार !
आषाढी एकादशी निमित्त संत तुकारामांच्या अभंगांवर आधारित ‘तुका म्हणे’ हा  रंगनृत्य आविष्कार ‘कलावर्धिनी चॅरिटेबल ट्रस्ट’ तर्फे रविवारी, ७ जुलै रोजी   सकाळी ९. ४५ वाजता
यशवंतराव चव्हाण नाट्यगृह (कोथरूड, पुणे) येथे
आयोजित करण्यात आला होता.
 संकल्पना आणि दिग्दर्शन अरुंधती पटवर्धन, कल्याणी काणे यांचे होते . अरूंधती पटवर्धन, पायल जाधव यांनी बहारदार सादरीकरण केले.
‘ सुंदर ते ध्यान ‘, ‘ भेटी लागे जीवा ‘ , ‘ बोलावा विठ्ठल – पहावा विठ्ठल ‘  , ‘याचसाठी केला होता अट्टहास ‘ ,अशा   अजरामर अभंगरचना या कार्यक्रमात प्रस्तुत केल्या गेल्या, संतांच्या जीवनातील प्रसंग नृत्यातून सादर करण्यात आले. त्याला रसिकांनी भक्तीमय दाद दिली.
याचबरोबर  संत ज्ञानेश्वर, चोखामेळा, नरहरी सोनार, नामदेव,तुकाराम या संतांच्या  अभंग रचनांचा नृत्याविष्कार  ‘संत सेवा संघ’ आणि नीलिमा नृत्यालय  तर्फे ‘वैकुंठ नायका ‘ या नावाने याच कार्यक्रमात सादर करण्यात आला. ‘वैकुंठ नायका ‘ला संगीत जीवन धर्माधिकारी यांचे होते . वैकुंठनायका – अभंगउत्सव मध्ये
महाराष्ट्रीय संतांच्या अभंग रचनांचा नृत्याविष्कार सादर झाला.
‘वैकुंठनायका ‘आणि ‘देखील देवो ‘ या दोन अल्बम मधील अभंगांवर आधारित नृत्य स्पर्धांमधून बक्षीसपात्र नृत्य संरचनांचे सादरीकरण करण्यात आले.
गुरू शमा भाटे, पवित्र भट, मानसी वझे, अमृता , मनिषा अभय, तेजस्विनी साठे, अरुंधती पटवर्धन यांच्या शिष्या सहभागी झाल्या.
सर्व कलाकारांचा सत्कार नृत्य गुरु सुचेता चाफेकर यांच्या हस्ते करण्यात आला.
SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पहिले वहिले  डिजिटल डेटा संकलन आणि स्व-गणना सुविधेसह जनगणना 2027 चा  राष्ट्रीय स्तरावर प्रारंभ

जगातील सर्वात मोठी जनगणना मोहीम, जनगणना 2027 सुरू झाली आहे. भारत सरकारने...

पुण्यात ड्रग विक्री: 250 ते 300 जणांचे रॅकेट,8 आरोपी निष्पन्न

पुणे- पुण्यात २५० ते ३०० जणांचे एमडी ड्रग...

कार्यकारी अध्यक्षपदावरून प्रफुल्ल पटेल आणि प्रदेशाध्यक्षपदावरून सुनील तटकरे पदच्युत ? चर्चेचे वादळ

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्षपदावरून प्रफुल्ल पटेल आणि...