‘आयएमईडी’ मध्ये एमबीए विषयार्थ्यांसाठी इंडक्शन प्रोग्राम
पुणे :भारती विद्यापीठ ‘इन्स्टिटयूट ऑफ मॅनेजमेंट अँड आंत्रप्रुनरशिप डेव्हलपमेंट ‘आयएमईडी’ मध्ये ‘मुंबईचा जगप्रसिद्ध डबेवाला’ या विषयावरील व्यवस्थापनशास्त्र व्याख्यानास प्रतिसाद चांगला प्रतिसाद मिळाला . व्यवस्थापनशास्त्र व्याख्याते डॉ पवन अगरवाल यांनी मुंबई डबेवाल्यांच्या अचूक सेवा आणि यशाचे रहस्य सांगितले .
‘इन्स्टिटयूट ऑफ मॅनेजमेंट अँड आंत्रप्रुनरशिप डेव्हलपमेंट ‘आयएमईडी’ चे संचालक डॉ. सचिन वेर्णेकर यांनी विद्यार्थ्यांना व्यवस्थापनशास्त्र शाखेतील कारकिर्दीच्या संधींची माहिती दिली . एमबीए च्या नव्या वर्षाच्या तुकडीचा इंडक्शन प्रोग्राम (स्वागत सोहळा ) ३ जुलै रोजी सकाळी पार पडला . ‘आयएमईडी’ च्या पौड रस्ता येथील कॅम्पस मध्ये हा कार्यक्रम झाला. व्यवस्थापनशास्त्राचे विद्यार्थी ,प्राध्यापक उपस्थित होते