पुणे :
इनामदार मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल तर्फे वारकऱ्यांसाठी आयोजित विनामूल्य आरोग्य शिबीराला आज चांगला प्रतिसाद मिळाला. २७ जून रोजी दिवसभर हे शिबीर अहुरा हाईट, शीतळादेवी चौक ( गुरुवार पेठ ) येथे नवयुग मंडळाच्या सहकार्याने आयोजित करण्यात आले होते .शेकडो वारकऱ्यांनी शिबिराचा लाभ घेतला.
वारकरी सेवेसाठी इनामदार मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक डॉ.परवेझ इनामदार,डॉ गणेश ननावरे,सुनील दाते,डॉ.श्रीकांत कदम,डॉ. श्रीकांत पवार,डॉ.दीक्षा तिवारी,डॉ. ज्योती उपस्थित होते . या उपक्रमाचे हे नववे वर्ष होते. 20 डॉक्टर्स आणि परिचारिका या शिबिरात सहभागी झाल्या .

