पुणे :
‘स्माईल’(सावित्री मार्केटिंग इन्स्टिट्यूट फॉर लेडिज एम्पावरमेंट) या स्वयंसेवी संस्थेच्या वतीने महिला बचत गट प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. हे प्रदर्शन दिनांक 12 ऑक्टोबर पासून ते 15 ऑक्टोबर 2017 पर्यंत सकाळी 10 ते रात्री 8 वाजेपर्यंत विश्रामबाग वाडा येथे सर्वांसाठी खुले राहणार आहेे.
‘स्फूर्ती महिला मंडळा’च्या अध्यक्ष, खासदार अॅड वंदना चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेले ‘स्माईल’ हे विक्री केंद्र गेली 17 वर्षे लोकमान्य नगर, कात्रज आणि विश्रामबाग वाडा येथे सुरू आहे.
दिवाळीनिमित्त आयोजित या प्रदर्शनामध्ये ‘स्माईल’ संस्थेच्या बचट गटातील महिला उद्योजकांनी खण आणि जूटपासून तयार केलेल्या बॅग, दिवाळी फराळ, विविध प्रकारच्या पणत्या, भेट वस्तू, आकाशकंदील, ज्वेलरी आदी वस्तूंचा समावेश या प्रदर्शनात आहे.
‘उद्योजक महिलांच्या सुप्त कलेला योग्य वाट देण्याकरीता, महिलांचे सक्षमीकरण तसेच त्यांना रोजगार मिळवून देण्यासाठी हक्काचे विक्री केंद्र असलेल्या ‘स्माईल’ (सावित्री मार्केटिंग इन्स्टिट्यूट फॉर लेडिज एम्पावरमेंट) या स्वयंसेवी संस्थेच्या वतीने आयोजित दिवाळी प्रदर्शन महिलांसाठी उपयुक्त ठरेल.
तरी पुणेकरांनी जास्तीत जास्त संख्येने प्रदर्शनास भेट देण्याचे आवाहन खा.वंदना चव्हाण (‘स्फूर्ती महिला मंडळा’च्या अध्यक्ष) यांनी केले आहे.


